पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किष्किधाकांड. दमामे बहू रंगसंगीतरंगें । फेगी तो भ्रमे ऊर्ध्व धांवे प्रसंगें ॥ स्वरांच्या स्वयें क्रोधल्या देवकोटी । झणी जाणते त्या कळे स्वर्गलोटी ॥ १५२ ।। पुढे नारदादीक कीतेक आले । समस्ता मनें सूख ऊदंड जाले । कथाभाग तो पाहिजे चालवीला | प्रसंगें तया वाळिला मृत्यु आला ॥ १५३ ।। अती लोळ कल्लोळ कोल्हाळ जाला । महाशब्द नानापरी घोष जाला ॥ बहू दुःख जाले तया सुनिवाला । कृपाळपणे राम बोले तयाला ।। १५४ ।। उभा राम निष्काम लावण्यखाणी । मुनी देव गंधर्व गाती पुराणी ।। धनुष्यासि टेकोनियां वाम बाहे | कृपाळूपणे सुग्रिवालागि बाहे ।। १५५ ॥ विचारे अवीचार कां प्राप्त जाला । उजेडासि अंधार जिंकोनि आला ॥ महाज्ञानिया तो भवी बूडवीला । असें दीसते भासतें या मनाला ।। १५६ ॥in सुबुद्धा तुवां शीघ्र आतां उठावें । विधीयुक्त ते कर्म सर्वे करावें ।। बहू शोक केल्या पुढे काय आहे । जनी जाणता तूं विचारूनि पाहे ।। १५७ ।। असंभाव्य दुःखानळे प्राण फूटे । प्रभू बोलतां वीर तात्काळ ऊठे | Fipiyri रविप्रीयांच्या बोलिले हृदयासी । विधीयुक्त आरंभिले या विधीसी ।। १५८ ॥ महा पाप त्या नाम घेतां न राहे । असा राम विश्राम दृष्टीस पाहे ॥णना दहेवेशघातासि संपादियेले । यथासांग ने कर्म ते सांग केले ।। १५९ ॥ पुढे राम भेटी कपीरान गेले । उभे हात जोडूनि ऊदीत ठेले ॥ रघनायके सनिवा बैसवीले । प्रधानाप्रती आदरे वाक्य बोले ॥१६॥ तुम्ही सर्व तात्काळ पूरीसि नावें । कपीलागि भैद्रासनी बैसवावें ॥ प्रधानी तिहीं राम आज्ञे प्रमाणे । महावीर सुग्रीव नेला स्फुराणे ।। १६१ ।। समस्तों विधायुक्त तो पै? दीला । कपीराज भद्रासनी बैसवीला || रघूनाथना चि निर्घोष केला । निशाणी बहू वाद्य कल्लोळ नाला ॥ १६२ ।। की अंगदा लागि प्राधान्य दीले । समस्तां मनी सूख ऊदंड जाले ।। पुरी सर्व शृंगारमंडीत केली । रघूनाथनामें गुढी ऊभवीली ॥ १६३ ॥igyan प्रधानासि घेऊनि ये राम भेटी । त्वरें चालिला जाहली थोर दाटी ।। पुढे राम संनीध येऊनि ऊभा । वदे राम लसूनि कैदर्पगाभा ।। १६४ ॥ समर्था तुवां दीन उद्धार केले । तेयेची प्रमाणे कृतकृत्य जाले ॥ मनी वाटते हे जरी भक्ति भावे । दयाळा यथायुक्ति तूला पुजावें ॥ १६५ ॥ अनूपम्य तो राम मंजूळ वाणी । कृपाळूपणे बोलिला चापपाणी ॥ व्रतस्थी अम्ही पैट्टाणाते न यावे । सदा दंडकारण्यवासी फिरावे ।। १६६ ।। २७. फणी शेष. २८. भद्रासन-सिंहासन. २९. पट्ट-मुकुट. कंदर्पगाभा मदनाचा पुतळा. ३१. चापपाणी-धनुष्य आहे हाती ज्याच्या असा. ३२. पट्टण-शहर.