पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११४) श्रीरामदासकृत पुढे अंगदा देखतां कंठ दाटे । बहुसाल नेत्रोदके पूर लोटे ।। प्रसंगी महा मोह आला कपीसी । रुदे बोलतां अंगदा कमरासी ॥ १३७ ॥ अरे अंगदा अंतरी फार होतें । मजे देखतां राज्य देईन तूते ॥ परी कल्पिले हे कदा ही घडेना । विधीसूत्र निर्माण हे लोटवेना ॥ १३८ ।। बहूतां परी बोलिलों सुनिवासी । मशी साम्य रे मानिं तूं आदरेशी ।। महा सूकते जोडली रामसेवा । अखंडीत हा भाव पायीं असावा ॥ १३९ ।। बहू शीकवीले तया अंगदाला । पुढे लक्षिता जाहला राघवाला ॥ म्हणे धन्य हे भाग्य ती भोट जाली । करूणा स्वरें स्तुति ऊदंड केली ।। १४०॥ किती सावने साधिती योगधारी । गिरीकंदरीं उग्रता पूर्णहारी ।। तयालागिं तूं किंचिती भेट देसी । नसे तूळणा आमुच्या सूकतासी ॥ १४१ ।। महा पातकी घातकी थोर वाली। किती ब्रह्महत्या वदे कोण त्याला ॥ असंख्यात नामें तया भेटलासी । नसे तळणा आमच्या सूकतासी ।। १४२ ।। अहल्या शिळा कष्टली त्या वनांती । सदा सर्वदा तूज चिंतीत होती ।। बहूतां दिना दीन तूं उद्धरीसी । नसे तूळणा आमुच्या सूकृतासी ।। १४३ ।। वनामाजि भिल्ली महा भक्त होती । अखंडीत ते मानसीं पाय चिंती ।। उचिष्टे तरी सेविसी त्या फळांसी । नसे तळणा आमुच्या सूकृतासी ।। १४४ ।। कळेना लिला राहिले वेद चारी | बहू शीणला वर्णितां सृष्टिधारी ।। अकस्मात पायींच धाऊनि येसी । नसे तूळणा आमुच्या सूकृतासी ॥ १४५ ।। नसे अल्प ही स्वल्प ही पुण्य कांहीं । बहू चंड ऊदंड पाखंड देहीं ।। महा सूख अद्भूत वालीस देसी । नसे तूळणा आमुच्या सूकतासी ॥ १४६ ।। तुझे नाम हे [ची ] महा पुण्य भासे । तुझे दर्शने हेतु तो सर्व नासे ।। करे बाण या हृदयीं स्पर्शलासी । नसे तुळणा आमच्या सकृतासी ।। १४७ ॥ परी अल्प ही होय देहासि वेथा । कृपासागरा सोडवावे समर्था । तुझा बाण निर्वाण जाला न सोडी । दयाळा तुझा तूं चि येऊनि काटी।। १४८।। प्रसंगें वदे वाळि हा दैन्यवाणा । कृपाळूपणे उठिला रामराणा । उरी पाय देऊनियां बाण काढी । मुखी रामनामें चि तो प्राण सोडी ॥१४९।। सुरांचा नभी सर्व मेळा मिळाला । बहू तोष तो पुष्पवर्षाव केला || अनंदें बहू गर्जना रामनामें | बळे वाजली टाळिले विघ्न रामे ।। १५०॥ पुढे सर्व गंधर्व तेथे मिळाले । अकस्मात स्वागनानृत्य केले ॥ मनोरभ्य आरंभिले गायनासी । अलापें चि तो रोध सिंधुंजळासी ॥ १५१ ।। २४. सृष्टिधारी शेष. २५. स्वर्गागना अप्सरा. २६. सिंधुजळासी रोध आला समुद्राचे पाणी (गाणे सुस्वर ऐकून) स्तब्ध झाले.