पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किष्किंधाकांड.. (११३) शिराखालि घालोनिया वाम जानू । ह्मणे गूण तूझे किती काय वर्ण । बळी तूं बळाचा दुजा स्वामि कैचा । वदे विक्रम सत्य नो सत्यवाचा ।। १२१ ।। तरी अंगदें सूचना सर्व केली । यथार्थं तरी मी बहू जाणवीली ।। रघूनाथ विख्यात पुरुषार्थ ज्याचा । मरीचीसि तो घाय वारा नयाचा ॥ १२२।। सुबाहू रणी पाडिला एक बाणे । अधी ताटिका मारिली थोर त्राणे ।। शिवे चाप दीले तया भार्गवाला । बळे भग्न केले महा दर्प ज्याला ।। १२३ ।। असा राम जो साह्य त्या सुनिवासी । बळें ताड छेदूनि छेदी गिरीसी ।। कशी वेळ आली अशा वाळिला हे । इया ऊपरी काळ तो क्षीण आहे॥१२४॥ किती बोलिल्या कांहिं केल्या न राहे । वदे मागुता मागुता घोर आहे ।। तु लागि त्या राघवे मुक्त केले । परी भाग्य सौभाग्य माझेचि गेले ।। १२५ ॥ बहू ताप संताप ऊदंड केला । रघुराज तो सन्मुखी देखियेला ॥ प्रभूशी तशी बोलती शीघ्र जाली । असंभाव्य ते स्तूति ऊदंड केली ।। १२६ ।। दिनोद्धारणा कारणा भक्त-पाळा | रघूनायका दीन-कारुण्य-लीळा ।। तुझे नाम विश्राम लोकत्रयासी । निजध्यास विश्वास मोठा शिवासी ॥ १२७ ।। नव्हे न्याय अन्याय दीसनि आला | कसा साह्य जालासि त्या सुनिवाला ॥ तया रावणालागि बांधोनि घाली । तशा वाळिशी मैत्रिकी कां न केली ॥ १२८ ।। अयोध्योस तो भरत राज्यकारी । सिता रावणे चोरिली दिव्य नारी ॥ तुझा शत्रु जो सोडिले कां तयाला । कपी वाळिने काय अन्याय केला ।। १२९॥ पुढे वाळिची मर्छना शांत जाली । रवी-सत ऊभा वरी दृष्टि गेली ॥ बहुतां परी सुग्रिवा हीत सांगे । झळंबे मनी लोभ तेणे प्रसंगें ॥ १३० ॥ जगनाथ हा राम कारुण्य-सिंधू । कृपाळूपणे भेटला दीनबंधू ॥ महासूकृते जोडले पाय तूझे । बहूतां परी आदरे साह्य कीजे ॥ १३१ ।। कपी सर्व घेऊनि जा त्रीकुटासी । रघूनाथ मारील त्या रावणासी ॥ सिते विश्वमातेसि आणूनि देई । तयाऊपरी तूं पुरीमाजि जाईं ॥ १३२ ।। पढे सर्वदां सख्य त्याशी करावें । कदां ही अणूमात्र रीती नसावे ॥ तुला थोर आधार हा जाण भावे । पुरीमाजि त्वां राज्य सूखे करावें ॥ १३३ ।। महा थोर हे राज्य किष्किधपूरी । असावे बहू विक्रमें नामधारी ।। परी पाहतां सर्व ही तूज आहे । परी युक्तिने बुद्धिने नीति राहे ॥ १३४ ॥ अरे पद ते मंत्रिया अंगदाला । जसा मी तसा तूं चि आहेसि त्याला ।। किती सांगणे तूं भला दक्ष आहे । बरी कीर्ति जे ते चि ते ऊरताहे ॥ १३५ ॥ अती मीरवू मी तुला काय की से। असे मृत्यु त्याची तुवां पाळिजेते ।। प्रवृत्तीजनामाजि हे गोष्ट आहे । परी सांगतो जीव माझा न राहे ॥ १३६ ॥