पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११२) श्रीरामदासकृत तुम्हांलागि सांगीतले सर्व होतें । तुम्हां देखतां ताडिले मुष्टिघातें ॥ १०५ ।। वदे रामराजा विरा ऐक वोजा । कळेना चि तो कोण शत्रू चि तूझा ॥ अकस्मात तूला चि लागेल जेव्हां । न चाले पुढे सर्वथा यत्न तेव्हां ।। १०६ ।। तया कारणे धीर ऊदंड केला । रघूनायके हार त्या लागि दीला ॥ गळां हार त्याला कपी खूण जाली । कपी जाय गा मागुता धांव घाली ।। १०७ ।। बहूतां परी धाडिले सुनिवासी । गिरीशृंग घेऊनि धावे त्वरेशी ।। उठे शकसूतू तयालागि तोरी | न जावे ह्मणे येत नाही विचारा ।। १०८॥ प्रितीपात्र हा अंगदू सांगताहे । कपीलागि तो आहला राम साहे ।। समर्था तरी कासया लागि जावे | असे जालिया येश नाही स्वभावे ।। १०९।। रघूनाथ हा थोर माहाप्रतापी । अनाथासिं देखूनि कृपा समी ।। तयाशी कदां झंजतां पूरवेना । पढें देखतां धीर पोटी धरना ।। ११० ।। न माने तया सांगतां गर्व केला । बह साल वाळीस तो क्रोध आला ।। म्हणे ऐकतो रे दशग्रीव आला । तये चोरिले की प्रिये जानकीला ।। १११॥ वधू कारणे सनिवा मेळवीतो । तयाचे शरे आमुचा प्राण जातो ॥ असे हे घडो पाहते ते चि काळी | गिरीशंग ते राहती अंतराळीं ॥ ११२ ॥ अशी तूं कशी सांगसी या भयाला । कसा कोण मी दीसतो वाळे तूला ॥ बळे पालथे या भगोळास घाली । करें पोकळीमाजि ब्रह्मांड झेली।। ११३ ।। निघाला बळी दीधली हाक मोठी । दिशा दिग्गजां जाहली थोर आटी । महा पुच्छ ऊभारिले सव्य बाहो । बहूसाल कोपिन्नला तप्त देहो ॥ ११४ ॥ अकस्मात तो वाळि सुग्रीव ताडी । बहू कोपला थोर पोटी कडाडी ।। गळां हार तो मार वेगीं चकावी । तया शेष देखोनि माथा तुकावी ॥ ११५ ॥ बहू कोपला तापला थोर तापा । पुन्हा मागुता ताडिला वजथापा । तळी घातले शीघ्र त्या सुग्रीवासी । रघुराज दूरूनि लक्षी तयासी ।। ११६ ॥ पुढे सज्जिले चाप चंद्रार्धबाणे । भले लक्षिले वक्ष ते वजठाणे ।। तया वाळिला मूर्छना थोर आली । निचेष्टीत भूमीवरी आंग घाली ।। ११७ ।। बहूसाल त्या सुग्रिवे शोक केला । सुकूमार कूमार तो शीघ्र आला ।। पुढे शीव्र वार्ता परी माजि गेली । अकस्मात तारा भुमी अंग घाली ॥ ११८ ॥ नव्हे धार डोळा बहू नीर लोटे । पिटी भाल हो आजि कल्पांत बाटे ।। त्वरे धांव नारायणा मासि पाहे । महावीर तो वाळि मुर्चीत आहे ॥ ११९ ।। समर्था मला कासया मोकलीले । बहू सूख मागील ते आठवीले ।। अहारे अहा असे काय झाले । कसें पूर्व संचीत टाकूनि आले ।। १२० ॥ २३. तारा वाळीच्या स्त्रीचें नांव.