पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११०) श्रीरामदासकृत प्रसंगी तये घोष अद्भत जाला । मला भासले इंद्र-तू निमाला ।। ७४ ॥ तया ऊपरी कर्म म्यां सांग केले । पुरी माजि सर्वांस हे जाणवीले ।। प्रधानी समस्ती मला राय केला | पुढे येक संवत्सरे वाळि आला ॥ ७५ ।। तयें देखिले राज्यधारी प्रसंगें । बहू क्षोभला धांवला लागवेगें ।। मला शीघ्र ताडिन्नले थोर हाते । पळालो त्वरे चालवेना जिवित्वे ।। ७६ ॥ कृपाळूपणे पूसिले राघवाने । तुला ये स्थळी सोडिले कां तयाने ।। रवी-संत साकल्य सांगे प्रभूला । वरी ना च रे तो ऋषी-शाप जाला ।। ७७ ॥ ऋषी कोण तो कां तयें शापियेले । कपीसुग्रिवाते रघुराज बोले ।। प्रसंगी कथा मूळपासूनि सांगें । दिनानाथ साकल्य पूसे प्रसंगे ॥ ७८ ॥ महा स्थूळ अद्भूत राक्षेस होता । बहू थोर म्हैसा सदा रूप-धर्ता ॥ तया दुंदुभी नाम ते देव-राया । नसे तूळितां दूसरा त्या तुळाया ॥ ७९ ॥ अती मातला गर्व पोटी न साहे । समुद्रासि जाऊनि युद्धासि बाहे ॥ भये भूलला सिंधु बाहेर आला । बहू रत्न देऊनि संतोषवीला ॥ ८ ॥ म्हणो लागला सागरू पैल पाहे । महाचंड युद्धासि तो थोर आहे ।। तुं पाहीं बहू मानसी गर्व केला । तेथें लौकरी नाय झुंजेल तूला ।। ८१ ॥ पुढे दुंदुभी पर्वतालागिं सांगे। महा थोर पाषाण लोटीत वेगें ।।। गिरी ही तया लीन होऊनि आला । बहू स्तूति बोलोनि आनंदवीला. ॥ २ ॥ महापर्वतू राक्षसा लागिं सांगे | बळी वाळि प्रख्यात हो पैल वागे ।। समक्षा तुझी तो चि तो पूरवीता । तेथे जाय तूं जाय गा शीघ्र आतां ।। ८३ ॥ पुढे वीर किंष्किध-पूरास आला । समाचार वीदीत जाला कपीला ।। रणा दारुणा माजि दोघे बळाचे । महा प्रौढ युद्भू तये दुंदुभीचे ।। ८४ ॥ बळे भांडतां भांडतां थोर म्हैसा । तया लाथ मारी कपी काळ जैसा ॥ पदे हाणतां देह तो चूर जाला । अकस्मात ऊडोनि येथे चि आला ॥ ८५ ॥ तपस्वी मुनी बैसला ध्यानकर्ता । तदां येक नेमें चि सामर्थ्य धर्ता ।।। तयें देखिला पर्वतू रक्तमेदा । मतंग मनी पावला थोर खेदा ।। ८६ ।। असा तो कसा कोण तो मातलाहे । तया लाागं हा शाप माझा चि आहे ।। ऋषी-पर्वती येत वेळे तयाला । क्षयो प्राप्त होईल नेमस्त त्याला ।। ८७ ।। ह्मणोनी समर्था तया येववेना । किती जाहले ची तरी मारवेना ॥ कृपाळपणे साह्य माझे करावें । दयासागरा दीन ते उद्धरावे ।। ८८॥ निराधार आधार काही च नाहीं । बह गांजलो पीडलो थोर कांहीं ।। नये बोलतां काय सांगूनि कोणा | वदो काय मखें अती दैन्यवाणा ।। ८९ ।। १९. इंद्रसूत-वाळी. २०. रविसुत सुग्रोव. २१. मतंगू-मातंगऋषि.