पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किष्किंधाकांड. कसा गा कपी तो कपी-राज कोठे । कसा शीघ्र आम्हांसि येऊनि भेटे ।। सिता ठाउकी कीं तया लागि नाहीं । प्रतीउत्तरू बोलतो भीम-देही ।। ५९ ॥ हनूमंत बोले पुसावे तयाला । श्रुता ती मला नाहिं वार्ता दयाळा ।। परी वर्तमानासि तो दीनबंधू । म्हणे काय रे काय रे सौख्य-सिंधू ॥ ६० ।। महाभीम बोले रघनायकासी । करा सौख्य ते आदरे सनिवासी ॥ करी सर्व ही साह्यता तो स्वभावें । परी साह्य आधी तयाचे करावे ॥ ६१ ।। त्वरें जाय घेऊनि ये त्यासि आतां । भयाभीत होऊ नको सोडि चिंता ॥ म्हणावे तुझे ऊसणे सर्व घेतो । पुढे राज्य कांता तुझी तूज देतो ।। ६२ ।। उडाला कपी साक्ष भीम-रूपी । त्वरें सुग्रिवा सर्व वार्ता समी ।। बरा काळ आला तुझा भोग गेला । भले सांगतो भेट त्या राघवाला ॥६३ ॥ महावीर हे धीर मोठे प्रतापी । रणी भीडतां दीसती काळरूपी ।। तयाचे पढ़ें वाळि तो काय कीती । तुला साह्य होती पहावी प्रचीती ॥ ६४॥ महा विक्रम सांगसी थोर त्यांचा । नसे अल्प ही लेश तो दूरिताचा ॥ तरी त्यांसि येथे चि घेऊनि यावे | मनांतील दीसल सर्व स्वभावे ॥६५॥ पुन्हा अंजनी-सूत येऊनि पाहे । रघूनाथ लक्ष्मणू बैसलाहे ।। समर्था दिना लागि ह्या थोर कीने । उदासीन त्या सुनिवाला न कीजे ॥६६॥ दयाळू म्हणे गा बरे जाउं आतां । त्वरे चालिला त्या गृहाच्यानि पंथा । हनूमंत जाऊनि साकल्य सांगे । त्वरे बाहिरी येतसे लागवेगे ।। ६७ ॥ अलंकार भांगीर त्या जानकीचा । बह रम्य लावण्य नाना परीचा ॥ दशग्रीव लंकोस नेते प्रसंगी । जगन्माउली भूषणे सर्व त्यागी ॥ ६८॥ अकस्मात ते सुग्रिवा प्राप्त झाले । गृहामाज पेटीत घालूनि ठेले ।। प्रसंगी रघूनाथ-भेटी निघाले । अलंकार घेऊनि सन्मूख आले ।। ६९ ॥ अती आदरे भेटला राघवासी । नमस्कार साष्टांग केला. प्रभूसी ॥ कृपाळूपणे राघवे ऊठवीला । सुमित्रा-सुतेही बहू गौरवीला ॥ ७० ॥ पुढे बैसले सर्व ही स्वस्थ झाले । अती आदरे राम मंजूळ बोले ।। तुला आणि वाळीस वीरोध जाला । कशा कारणे काय अन्याय केला ॥ ७१ ॥ कृपाळूपणे ऐक तूं रामराजा । कपीराज बोले यथार्थेचि बोजा ॥ बहू राक्षसू थोर मायावि आला । तये बाळिशी थोर संग्राम केला ।। ७२ ॥ बहू झुंजतां झुंजतां तो पळाला । महा एक गृहे मध्ये शीघ्र गेला ॥ तया पाठिशी धांवला शीघ्र वाळी । मला ठेविले रक्षणा तेचि काळीं ॥ ७३ ॥ पुढे युद्ध दोघांसि ऊदंड झालें । बहू रक्त ते मांस बाहेर आले ॥ १८. भांगार-सोने ( हा कानडी भाषेत शब्द प्रसिद्ध आहे )