पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीरामदासकृत सुवणे कसी कांस वीराजताहे । सुमित्रा म्हणे राम आश्चर्य पाहें ।। ४३ ॥ हनमंत ऐकनि विस्मीत ठेला । वदे अंजनी तो चि हा स्वामि आला ॥ मनामाजि वीचारिले आदरेशी | नमस्कार साष्टांग केला प्रभसी ॥४४॥ पदी मस्तक ठेविला शीघ्र भावे । वरू दीधला स्वामि-देवाधिदेवें ॥ कृपाळपणे राम बोले तयासी । कपी वजदेही चिरंजीव होसी ॥४५॥ महा मस्तकी हस्त सीतापतीचा | जयाच्या वरा यत्न नाहीं विधीचा ।। शशी सर्य तारा-गण सष्टि आहे | चिरंजीव केले सदा वजदेहे ॥४६॥ कपी-मानसीं सूख ऊदंड जाले । दया-सागरें राघवें थोर केलें ॥ बहूसाल आनंदला राम तोषे | कपी लाधला भाव त्याचा विशेषे ॥ १७ ॥ पुढे मारुती स्तूति ऊदंड बोले । म्हणे धन्य की भाग्य हे दीन आले ॥ परी हीन ने दीन त्यां उद्धरीले । रघूनायका ब्रीद साचार केलें ॥ ४८ ॥ दयाळा तुझीये दयेवीण कांहीं । महायत्न केले तुझी भेट नाहीं ॥ परी स्वप्नसे भासते या मनाला । नसे पुण्य की सौख्य जाले दिनाला ॥ ४९ ॥ प्रभू अंजनीला पुसे लागवेगें । पुढे अंजना सर्व ही खूण सांगे ॥ तुझी कास जाणेल तो स्वामितझा । तयारंभि ऊतावळा प्राण माझा ॥ ५० ॥ गिरी-शीखरे थोरयोरे अपारे । वने भूवने पावने सौख्यकारें ।। बहू हिंडलों धुंडिले वोळखाया । परी दीससी तूं न गा देवराया ॥ ५१ ॥ बहू आवडी तांतडी लोचनाला । वदें कार्य कांही कळेना जनाला॥ अवस्था मनीं आसतां प्राप्ति नाहीं । न वाटे समर्था प्रभू गोड कांहीं ॥ ५२ ।। अकस्मात ते मात कित्येक काळीं । प्रभू राम आला ऋषी-राज- मेळीं ॥ अहल्या पदी दिव्य होऊन गेली । समां बहू कीर्ति विख्यात जाली ॥ ५३ ।। अहा सत्य हे वाटले सौख्य जीवा । उभा राहुं पाहे अतां पूर्व ठेवा ॥ परी अंतरी धीर केला धरेना | बहूसाल वीयोग पापी सरेना ।। ५४ ।। पहाया समर्था बहू यत्न केला । नव्हे साध्यता सर्व ही व्यर्थ गेला ॥ अतां पूर आला कृपेचा दयाळा । तरी प्राण हा सर्व ही तृप्त झाला ॥ ५५॥ यथार्थ चि वाक्या वदे तो वनारी । कृपा- उत्तरे सौख्य दे रावणारी ।। बहू गोड वाणी समाधान केले । प्रसंगी कपीला सुधा-पान* झाले ॥ २६ ॥ पुढे शेष-पायांवरी शीघ्र माथा । त्वरें ठेवितां ऊठवी राम-भ्राता ॥ बहूतां परी उत्तरे गौरवीला | कपी-मानसी हर्ष ऊदंड जाला ।। ५७ ॥ पुढे राघवालागि सौमित्र सांगे | कपी-सुग्रिवाचा गिरी पैल शंगे। तये धाडिले यासि शुद्धीस आहे । पुसाया तया लागि तो राम बाहे ॥ ५८ ।। १७. सुवर्ण=भरजरी पीतांबर. * "क्षुधापान' पा० भे०.