पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किष्किंधाकांड. महाथोर गुफा तये माजि सीता । त्वरे भोवती घातली रेघ जातां ।। पढें रावणे याचकी वेष केला । तिथे भीक मागावया शीघ्र आला ॥ २८॥ न चाले चि काही पुढे जाववेना । तया जानकीते कदा नेववेना ।। करूणास्वरे उत्तरे फार बोले । दये घालितां भीक तत्काळ नेलें ॥ २९ ॥ मुगा मारिले राघवे बाण-घाते । गृहा मानि येतां न देखे सितेते ॥ जरी भेटता रावणू पापरूपी । नसे प्राप्ति ब्रह्मांदिकां गोष्टि सोपी ।। ३०॥ महा विक्रम राघवाचा कळेना । रणामानि हो ठाण ज्याचे चळेना । परूषार्थ सांगीतला सर्व कांहीं । वदे मागुती देखिले त्यासि नाहीं ॥ ३१ ॥ जये सर्व क्षेत्रास निधूत केले । धरत्रीवरी नांव ते ही न चाले ।। तया भार्गवा राघवे जिकियेलें । कळेना तुला नेणसी तूं कपी रे ।। ३२ ।। हनमंत वीचारितो अंतरेसी । वये बाळ-लीला वदे विक्रमासी।। तरी यावरी वृक्ष घालनि पाहूं । असे भाउनी झेलिला ऊर्ध्व वाह ॥ ३३ ॥ थोर झाडे झुबाडे चि खोडे । कपी मोडता जाहला नै कडाडे ।। अकस्मात टाकी रघूनाथ जेये । शरे शीघ्र वारी समित्र तयांते ॥ ३४॥ कपी मागुता मागुता थोरथोरें । बळे वृक्ष घेऊनियां भूभुकारे ।। की टाकितां शेष वारी तयांते । विचारी मनी काय कीजे अशाते ।। ३५ ।। प्रनायकाला बह झोप आली । कपी मागुता मागुता वक्ष घाली ।। जया हालता बोलतां चालतां ही । करी प्रेत्न नाना न चाले चि कांहीं ।। ३६ ।। खगावी दटावी तयाते उठावी । पुढे मागुता वृक्ष पुन्हा उठावी ।। धबाबां बह साल पाषाण टाकी । वरीच्यावरी वीर बाणे चि झोकी ॥ ३७॥ बह वक्षपाषाण नाना परीचे । कडे टाकिले मोठमोठे गिराचे ॥ परी अल्प रामावरी येउं देना | महावीर हा शेष लक्षी चुकेना ।। ३८ ॥ बह वारितां वारितां ढीग जाले । गिरीचेपरी दूर होऊनि ठेले ।। मनामाजि चक्कीत जाला वनारी । पुरावा करी तीतुका ही निवारी ॥ ३९ ॥ बहू घोष वीशेष कित्येक केले । कडाडां तरू मोडिले चूर केले ॥ न चाले कपीचे नसे वृक्ष माथां । नसे तूळणा तूळितां त्या समर्था ॥ ४० ॥ बहसाल म्यां मानसीं गर्व केला । भला वीर सौमित्र तो देखियेला । पहा एक तो धाकुटा वीर्य-सिंधू । प्रभू राम निद्रिस्त हा दीनबंधू ॥ ४१ ।। कपी ही उगा बैसला स्थीर राहे । महा वीर लक्षमण त्यासि पाहे ॥ दिनोद्वारणे सांग विश्रांति केली । प्रसंगी उठाया तया वेळ आली ॥ ४२ ॥ रघुनायका लागि जागर्ति जाली । कपी वृक्ष-माथ्यावरी दृष्टि गेली ।। ११. क्षत्रास क्षत्रियांना. १५. लक्ष निशाण. १६. दिनोद्धारणे-रामाने,