पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०६) श्रीरामदासकृत सुकूमार पायीं कदाही न चाले | बह हिंडतां हिंडतां कष्ट जाले ॥ अशा कारण राम पंथीं निजेले । अकस्मात ते सुनिवे देखियेले ॥ १३ ॥ रुपे योगधारी मना सौख्यकारी । महावीर हा कोण कामा-धिकारी ।। मनी वाटते वाळिने धाडिले हे | भयाभीत होऊनि चक्कीत पाहे ।। १४ ।। हनूमंत बोले तया सुनिवासी । नव्हे हो तसे साक्ष येते मनासी ।। कळेना लिळा दीसती सौख्यवासी । असे वाटते साह्य आले तुह्मांसी ।। १५ ।। तें सुग्रीव बोले तरी जाय आतां । मनांतील घेऊनियां बुद्धि आतां ।। तया धाडिले राम सौमित्र जेथे । स्वये चालिला शीघ्र तो दूरि पंथे । १६ ।। हनूमंत दूरूनि येऊनि पाहे । सुमित्रासुतू सिद्ध तो बैसला हे ॥ रघूराय मांडीवरी सौख्यकारी । पुढे बोलता जाहला तो वनारी ।। १७ ॥ रुपे योग-मर्ति धनुर्बाण हातीं । वये बाळ-लीला फिरा कां दिगती ।। पुढे कोठ पर्यंत माणे तुझांसी । अहां कोण ऐसे वदा निश्चयेशी ।। १८ ॥ कपी कोण तूं पूससी कासयारे । मला सांग साकल्य तूं सर्व सारे ॥ प्रसंगों फैणी बोलतो तो स्वभावें । प्रिती मारुती जाणवी सर्व भावें ॥ १९ ॥ प्रभू अंजनी माय या बा कपीची। पिता तत्वता वायु माझा तसाची ।। पुसाया तुम्हां सुनिवे पाठवीलें । समर्थाप्रती सर्व म्यां जाणवीले ।। २० ।। प्रतीउत्तरे बोलता शेष जाला । कपी ऐक रे सांगतो सर्व तूला ॥ जनों सूर्य-वंशी नपाधीक राने । बह कीर्तिचा घोष अद्भूत गाजे ।। २१ ।। तयावंशिंचे दोन हे बंधु पाहे । रघनाथ लक्ष्मणू नांव आहे ।। पिता धाडिता जाहला त्यां वनासी । निघालों जनी पंथि या सौख्यरासी ।। २२ ।। सदा सर्वदा संतसेवा घडावी । अखंडीत वृत्ती पदी या जडावी ।। सर्व चालिलो आवडी राम जातां । जगन्माय ही जानकी विश्वमाता ।। १२ ।। वनी वास तीघांस कीतेक काळीं । सिता रावणे चोरिली भामबाळा ।। तये कारणे धुंडितो लागवेगें। किती फीरतो शद्धि कोठे न लागे ॥ २४ ॥ महावीर तुम्ही धनुर्बाणधारी । करूं दीधली रावणा केवि चोरी।। तया लाग तो शेष साकल्य बोले । न चाले चि येऊनि कापट्य केले ॥ २५ ॥ सुवर्णाचिया त्या मगालागि तेणें | चरायासि तें धाडिले रावणान ।। जगन्माय ती बोलली राघवासी । दिजे कंचकी स्वामिने आपणासा ॥ २६ ॥ उठे शीघ्र धांवे मगाच्याच पाठी । शरे मारि त्या राम कदप-काटा ।।। अकस्मात जाला ध्वनी घोष तेथे । मला धाडि श्री जानकी त्याच पंथे ॥ २७ ॥ १०. कामा-धिकारी मदनाला धिःकार करणारा म्हणजे अति रूपवान. ११. वनारीमारुती. १२. फणी लक्ष्मण. १३. शुद्धि-शोध.