पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत किष्किंधा*कांड प्रारंभ गणेशा इशा हा परेशा उदारा | सुरेशा नरेशा सदा सौख्यकारा ।। मनी चितितां कामना पूरताती । असे सत्य नेमस्त माझी प्रचीती ।। १॥ नमो शारदा सर्व संगीत-मर्ति । महा-हंस-लीला कळा सर्व कर्ती ।। जयाला दया देतसे स्फूर्ति फूटे । बहू घोर संसारिचे मूळ तूटे ॥ २ ॥ नमो साधुसंतां महंतां महंतां । सदा निश्चयो वीतरागी सतता ।। भवी बूडतां दीन तात्काळ काढी । तया वणवेना मला बुद्धि थोडी ।। ३ ।। अनिर्वाच्य वाचेसि कैसे यदावे । अतासि त कसे आकळावे ॥ अवीनाश कोदाटलें सर्व ठायीं । मुढा ज्ञान होता चि त्या स्वामिपायों ।। ४ ॥ नमो रामराया कथा-रंग-राया । बहू वर्णितां स्फूर्ति दे देवराया ॥ मनी-काव्य हे भव्य-शोकापहारी । हरा मानसी ध्यास हा सांख्यकारी चरित्रे रघूनाथजीची अपारे । मनोरम्य विस्तारली सौख्यकारे । तयामाजि तूं येक येकाक्षरासी | वदे पार नाहीं तया सूकृतासी ।। ६ ॥ जगनाथ हा राम कैवन्य-दाता | घडे वीघडे सर्व याचीच सत्ता ॥ जनाचे मनी हीत ते हेतु जाणे । परी वर्तवीतो भव: थोर माने ।। ७ ।। रघूनाथ लक्षुमणू आणि सीता | वनी वास तीघांस निःशेष होता ।। पुढें जानकी चोरिली रावणाने । बहू शोक केला रघूनायकाने ।। ८ ॥ वनी राम लक्ष्मण हिंडताती । सिता रावणे चोरिली धुंडिताती ।। अकस्मात तेव्हां सुचे राघवासी । विचारूं ह्मणे आदरें सुनिवासी ।। ९॥ ऋषीमूख माहागिरी पैल पाहे । कपीराज मीळांगि तेथे चि आहे ।। कदाचीत त्या पूस आसेल ठावे । सुमित्रा तयालागि वात पुसावे ॥ १९ ॥ चलावे समर्था ह्मणे ब्रह्मचारी । महावीर जाताति ते पंथहारी ।। बहू झाड-खंडे प्रचंडे उदंडें । अखंडे अखंडे ची बंडे उदंडे ।। ११ ।। बहू घोर झाडी तयामाजि आले । खरे सर्व लंघूनि पंपेसि गेले । तरू सुंदरू रम्य छाया बसाया । ह्मणे शेष याते चि या देवराया ॥ १२॥

  • किष्किंधा जेथें होती तेथे हल्ली अनागोंदी शहर आहे. हे तुंगभद्रेच्या काठी आहे.

१. प्रचीती (सं. प्रतीतो )=अनुभव. २. वीतरागी-सोडिला आहे संसार ज्यांनों असे. ३. अनिर्वाच्य-अवर्णनीय. ४ मनोकाव्य-बाल्मिको मुनीनं रचिलेलें रामायण. ५ कै-- वल्य-मोक्ष. ६. ऋषीमुख हे एका पर्वताचे नांव, ह्याचे शुद्ध संस्कृत रूप ऋष्यमूक असे आहे. ७. वात बातमी. . पपाएका सरोवराचें नांव. १. शेष शेषाचा अवतार लक्ष्मण.