पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. (८५) सुमित्रासुतू बैसला सैव्य भार्गी । जगन्मात सीता तया वामभागी ॥ ५६ ॥ विमानावरी वाजती घंटमाळा । खडे घोष हेलावती मक्तमाळा ।। समुद्रोदकी पूर्ण तारूं च जैसे । नभामानि ते चालिले भव्य तैसें ॥ ५७ ।। पुढे चालता चालतां लागवेगी | सितेलागि ते राम सांगे प्रसंगी ॥ रणामंडळी आट राक्षसकळा । त्रिकूटाचळू दाखवीली सुवेळा ।। ।। ५८ ॥ असंभाव्य पालाणिला सेतु जेथे । स्वये वास दर्भासनी योग तेथे ।। स्त्रिया रत्नमंडीत नानाविलासी । समुद्रातिरी भेटला तोपरांशी ।। ५९ ।। बळे आगळा वीर वाळी निमाला | दिले राज्य तेथे कपी सुनिवाला ।। अकस्मात जाली हनमंत भेटी । तटाके नद्या दाखवी वीर नेठी ।। ६० ।। जटायू पुढे पावला स्वर्गलोकीं । जनस्थान हे रम्य गोदातटाकीं ॥ पुढे चालतां राम राजाधिराने । तया राहवीले ऋषी भारद्वाजे ॥ ६१ ।। कपीची दळे भूतळी दाटि जाली । तया भारद्वाजे बहू स्तूति केली ।। । पुढे धाडिले मारुतीलागि देवें । म्हणे गा विरा भ्रातया भेटवावे ॥ १२ ॥ प्रभू बोलतां वीर तैसा निघाला । तया गृहकाने नमस्कार केला ।। स्तुती बोलतां तो समाचार सांगे। नंदीग्राम तो पावला लागवेगे ।। ६३ ।। कपी देखिला भव्य रामानुजाने । नमस्कार केला तया बांधवाने ।। कपी भेटला बैसला स्वस्थ नाला । समाचार साकल्य सांगे तपाला ।। ६४ ।। म्हणे मारुती बांधवाच्या वियोगें | पळे भासती ती किती काळयूगें ।। महद्भाग्य आलासि येणे प्रसंगी । रघुनाथ तो भेटवी लागवेगी ।। ६५ ।। उदासीन तो बंधु त्या राघवाचा । वदे मारुतीलागि कारुण्यवाचा ।। बहू कष्टलो काळ गेला दुखाचा । कधी राम भेटेल सिंधू सुखाचा ।। ६६ ॥ वृथा संपदा राज्य हे काय कीजे । उदासीन या राघवाला नमीजे ॥ पदें भोगिजे ते मदें बाधिजे ते । दिसेंदीस आयुष्य हे व्यर्थ नाते ।। ६७ ।। कितीएक ते भाग्य भोगन गेले । पन्हा मागुती मृत्युपंथें निमाले ।। कितीएक साध उदासीन जाले । महामंडळी लोक सूखे निवाले ।। ६८।। भले जाणती संपदा द:खदाती । स्वहीतापरा त्रास होता नियता ।। हरादाक ते तापसी या च लागी । सदा सर्वदां फीरती वीतरागी ।। ६९ ।। म्हणोनी मला राघवें वीण कांहीं । सदा सर्वदां वैभवें चाड नाहीं ।। १. सव्य या शब्दाचा अर्थ ॥ डावा" असा मूळचा आहे. परंतु लोक उजवा" असा चुकीने समजतात. याप्रमाणेच परोक्ष व अपरोक्ष यांचाही अर्थ लोक विपरीत सम- जतात. ५. वामभागी=डावेकडे.. मामाळा-मोत्यांचे हार. ७. पालाणीला लोगिरा- सारखा घातला. ८. तोयराशो समद्र.९.जनस्थान-नाशिक शहर.