पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत बहूसाल तूं राखिला स्नेहवाद । जनामानि नूं बन्य साधू अगाधू ॥ ११ ॥ स्नेहाळा तुंवा आनि ऐसे करावे | पुरीमाजि त्वां सुग्निवालागि न्यावें ॥ विलासे बहूतां परी सूख द्यावें । कपी ऋक्ष घेऊनि वेगे उठावें ॥ ४२ ।। सखा सुनिया सारिखा कोण आहे | मनामाजि बीभीषणा तूं च पाहे ।। जिवेशी सखा आमुचा साह्य जाला । असंभाव्य हा वीरमेळा मिळाला ॥ ४३ ॥ ननी मैत्रिकी राखिली सुनिवाने । बहूसाल हा कष्टला जीव प्राणे ।। स्वयं देखिले सांगणे काय तुम्हां । कपी पूजितां पावले सर्व आम्हां ।। १४ ।। पुढे शीच बीभीषणे ते चि काळी । अती आदरें ठेविलें वाक्य भाळी ॥ करी घेतले प्रीतिने सुग्रिवाला । म्हणे आजिचा काळ हा धन्य नाला ॥ ४५ ॥ समर्या गुणें तूं सखा जोडलासी । तुझा योग हा पार माही सुखासी ।।। कपी गक्ष घेऊनि तैसा निघाला । पढें शीघ्र लंकापुरीमान गेला ।। ४६ ॥ नळे निर्मळे सर्व अभ्यंग केले । अळंकार चारे कपी तोषवीले ।। बहूतां परीची सुगंधे फुलेले । समस्तांसि नाना रसे तृप्त केलें ॥ ४७ ।। रिसां वानरांला पुना सांग नाली | बहूसाल बीभीषणे स्तूति केली ।। महावीर विश्रांति पावून तेथें । निघाले पुढे सर्व हो राम जये ।। ४८ । सुगंधी बहू घातल्या पुष्पमाळा । 'अनीळे सुखे वास नेला भुगोळा ।। प्रभूला नमस्कार साष्टांग केले । मिळाले कपी ऋक्ष सखें निवाले ।। ४९ ।। सभेमाजि आली बहूसाल शोभा । पुढे राहिला हात नोडोनि ऊभा ।।। प्रसंगी तयें राम बीभीषणाला । सधाउत्तरी बोलता शीत्र जाला ॥ ५० ॥ म्हणे गा विरा त्वां पुरीमान जावें । ध्रुवाचे परी राज्य तेथे करावे ।। शशी सूर्य तारागणे अंतराळी । असावे सुखे भोगिजे सर्व काळी ।। ५१ ।। पुढे बोलिने शीघ नैऋत्यनाथें । म्हणे वासना पूरवावी समर्थे ।। प्रभू बोलतां चित्त माझे न राहे । पहावी अयोध्यापुरी वासना हे ।। ५२ ॥ पुरीमाजि भद्रासनी तूं नपाळा । महोत्साह उत्साह पाहेन डोळां ।। उदारा प्रभू सौख्य पाहेन संगें। निरोपें चि मी शीघ्र येईन मागे ।। ५३ ।। सवे घेतले वीर बीभीषणाला । रघराज तो बानरेशी निघाला ।। असंभाव्य तो वाद्यकल्लोळ माला । पढें सिद्ध केले महा पुष्पकाला ।। ५४ ।। नसे तूळणा रत्नमंडीत याना । महीतल्य त्या आणवीले विमाना ।। तयारूढ तो जाहला राम वेगी। कपी वीर ते आपलाल्या विभागीं ।। ५५ ॥ विमानावरी रामराजा विराने । वरी बैसले ते कपी रीस राजे ॥ १००.भनोळ वारा. १.सधाउत्तरी-गोड शब्दांनी. २.पष्पक-रावणाचे बिमान. ३. यान-वाहन.