पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत मला भेटवी राम आत्मा जगाचा । वदे मारुतीलागि तो दीन वाचा ।। ७० ॥ म्हणे मारुती धन्य गा धन्य साधू । महाशक्ति वीरक्ति बोधे अगाधू ।। नव्हे साधनें भेटि ब्रह्मांदिकाला । तुम्हांलागि भेटीस तो राम आला || ७१ ।। नमस्कार केला तया मारुतीने । रजे डोरले भाळ माहा विराने ।। प्रिती लागली अंतरी ते ढळेना । म्हणे धन्य गा धन्य लीळा कळेना ।। ७२ ।। तया देखतां चित्त सूखे निवाले । मनामाजि ते थोर आश्चर्य केले ।। म्हणे वीर अद्भूत वैराग्य कैसे । महद्भाग्य हे मानिले तृण जैसें ।। ७३ ।। पुढे वीर रामानुजे काय केले | पुरीमाजि शत्रुघना पाठविले ॥ समस्तां वसिष्ठांदिकां जाणविले । असंभाव्य तें सैन्य पालाणवीलें ।। ७४ ।। म्हणे वीर तो राम येईल आतां । सुखी जाहली मुख्य माता समस्तां ॥ प्रसंगें तये थोर आनंद जाला | पुरीमाजि तो लोक सर्वे मिळाला || ७५ ।। पुढे शीच पालीणिले दिव्य घोडे । महीमंडळी त्यांस नाहीत जोडे । असंभाव्य ती हीसती दिव्य घोडी । उफाळे तयां धांवतां भूमि थोडी ।। ७६ ।। मुठीळी झुली पाखरा मुक्तमाळा । बह रत्नमंडीत भासे उफाळा ।। अळंकार भांगार मंडीत केले। बहभार शंगारिले सिद्ध नाले || ७७ | गिरीसारिखी चंड बाडे अपारे । बहू मातली कुंजरें थोरथोरे ।। पताका झुली रम्य दिव्यांबरांच्या । बहू रंग लावण्य नाना परीच्या ।। ७८ ॥ महा मस्त ते हस्ति भारे निघाले । त्वरे चालतां भव्य सर्वांग डोले ।। भुमी हाणतां अंदु वाजे स्वणाणा | बळे वाजती चंड घंटा घणाणा ।। ८० ॥ तयारूढ ते वीर कीतीक जाले । धडाडीत सेना असंभाव्य चाले ।। शिबीका बहू साल सूखासनाते । पताका निशाणे फडाडीत वाते ।। ८० ॥ महावीर शत्रुघन लागवेगी । सुमंतू प्रधानू तया पृष्ठभागी ।। बहू वाद्य तो घोष गेला दिगंता । ऋषीराज वासिष्ठ त्या मुख्य माता ।। ८१ ।। पदीं चालिला मुख्य तो योगि बंधू । सवे घेतला मारुती वीर्यसिंधू । महा वीर दोघे पुढे शीव आले । असंभाव्य ते भार मागे उदेले ।। ८२ ॥ पढे राम तेथनि वेगी निघाला । महा पप्पकारूढ होऊनि आला ॥ त्वरे पावतां पावतां नंदिग्नामा । कपी वीर तो दाखवी शीघ्र व्योमा ।। ८३ ।। असंभाव्य ते तेन हेलावताहे । म्हणे गा कपी काय हे येत आहे ॥ तया सांगतो मारुती राम आला । नभामाजि तो पुष्पकारूढ जाला ।। ८४ ।। १०. पालाणवोलें-बोलविलें 1१. पालाणिले खोगीर चढविले (सं. पल्याण खोगीर ). १२. मुठाळी-बैल इत्यादिकांवर जें हलक्या प्रतीचे खोगिर घालतात त्याला मूठ किंवा माळी म्हणतात. १३. अदु-हत्तीच्या पायांतली बेडी.