पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. तुर्वा कार्य ते सर्व पूर्वी च केलें । रथारूढ होऊनियां येश आले ।। २६ ।। पुन्हा मागुते एक आतां करावे । निमाले कपी ऋक्ष त्या ऊठवावे ।। सेंधामेघ पाडनियां लागवेगी । महा वीर ते ऊठवीं ये प्रसंगी ।। २७ ।। मुखे बोलता जाहला चक्रपाणी । तेणे थोर संतोषला वजपाणी ।। प्रसंगों तये थोर आनंद जाला । नमस्कार केला रघनायकाला ।।।।२८ ॥ जळेशास आज्ञापिले ते चि काळी | महा मेघ ते चालिले अंतराळी ।। असंभाव्य ते जाहली मेघवृष्टी । तिणे भीजली सर्व ते प्रेतसृष्टी ।। २९॥ कपी रीस ते सर्व आले निमाले । नमस्कारिला राम सैन्यी मिळाले ॥ कळेना कळा कोण या राघवाची । मनी कल्पितां हांव परे मनाची ॥ ३० ॥ निमाले कपी पावले दिव्य देहो । मिळाला रिसां वानरांचा समूहो । सुवेळाचळामाजि ते भार आले । क्षमारूप तैसे चि सर्वे मिळाले ॥ ३१ ॥ मिळाले बहू देव कोट्यानुकोटी । असंभाव्य दोहों दळामाजि दाटी ।। मुखे बोलती देव त्या राघवाला । स्तुती उत्तरी तोषबीती दयाळा ॥ ३२ ॥ प्रसंगें चि आज्ञा समस्तांस द्यावी । पुन्हा मागुती सर्व चिंता असावी ॥ तुम्ही हो अयोध्यापुरीमाजि जावे । विलासे बहू राज्य सूखे करावे ॥ ३३ ॥ प्रती उत्तरी राम बोले समस्तां । म्हणे हो बरे जाइजे शीघ्र आतां ।। समस्ती तुम्हीं भूवनामाजि जावें । विलासे बहू राज्य सूखे करावे ।। ३४ ॥ मुखें बोलतां राम ते देव तोपें । करी पीटती टाळिका नामघोषे ।। नमस्कार केला रघनायकाला । समस्तां मनी थोर आनंद नाला ॥ ३५ ॥ रवी पावके येम नैऋत्यनायें । जळाक्ये र्धनाढ्ये रघुनायकातें ॥ गुरु अंगिरा देव गंधर्व ते ही। बहू बोलते जाहले सर्व कांहीं ॥ ३६ ॥

  • षा इव गध सबै मिळाले । स्ततीउत्तरी बोलते शीघ्र जाले ।

समस्तांसि सन्मानिले राघवाने । गणां किन्नरादीक गाती पुराणे ॥ ३७॥ निरोपें चि त्या चालिल्या देवकोडी । पढे शीघ्र बीभीषणू हात जोडी ॥ समर्था मला थोर आतां करावे । घडी एक लंकापुरीमाजि जावे ।। ३८ ।। धरावे मनामानि देवाधिदेवें । जनी सेवकालागि काही घडावे ॥ करावे समय जिणे श्लाघ्य माझें । घडावें महद्भाग्य हे दास्य तूझे ।। ३९ ॥ रा राम बोले तयासी । म्हणे धन्य बीभीषणा गणराशी ।। प्रसंगे सखा बंधु तूं जोडलासी । पुरेना तुझे संगतीची असोसी ।। ४० ॥ प्रितीच्या सुखा लागि कैसे वदावे । गुणाच्या गुणाला किती आठवावे ।। ९५. सुधामेघ अमृताचे ढग.९६. जळेश-वरुण. g मनों कल्पितां हांव पूरे मनाची-न चाले पढें बुद्धि ब्रम्हादिकांची..७.जळाव्य-वरुण.९८. धनाढ्य-कुबर.९९.'लाध्य-धन्य.