पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८२) श्रीरामदासकृत समस्तां मनी लागला ध्यास रामा । तुझे रूप ध्यातों सदां योगधामा ।। बहसाल हे बोलणे काय देवा । अखंडीत हा लोभ आतां असावा ।। ११ ।। प्रती उत्तरे राम बोले महेशा । उदाराधिशा सुंदरा देवधीशा ।। समर्था प्रभू लोकपाळा नृपाळा । लिळे जाळिशी पाळिशी या भुगोळा ।। १२ ।। तुझा योग होतां चि आनंद जाला । पुढे देखतां प्राण माझा निवाला ।। दयासागरा सर्व सांभाळ केला । सुखानंद हेलावला तृप्त जाला ।। १३ ।। पुढे बोलता जाहाला तो विरंची । म्हणे आजि हे धन्य वेळा सुखाची ।। तुझा योग होतां घडी अमृताची । बहू स्तूति केली रघूनायकाची ।। १४ ॥ किती बंधने पावलों पूर्व पापे | बहू दीस ओसंडिले मायबापे ।। बहु कष्ट केलेसि देवाधिदेवा । कृपाळूपणे शीघ्र केला कुडावा ।। १५ ॥ तुम्हां वेगळे सर्व ही दीन झाले । त्रिकूटाचळी बंदि शाळे मिळाले ।। दिनासारिखे जाहले दैन्यवाणे । प्रभ आमचे द:ख ते कोण जाणे ।। १६ ।। बहू कष्टविले तया रावणाने । घडीनेघडी त्रासिले दुर्जनाने ॥ गमे हानि येतां मनामाजि चिता । समस्तांस कोणी नसे सोडवीता ।। १७॥ . बहू वोखटी वेळ येऊन गेली । कृपासागरा धावणी शीघ्र केली ।। सतालाागं झेपावला व्याच तैसा । जगज्जन्नका तं समस्तांस तसा ।। १८ ॥ स्तुती उत्तरे बाळकू काय जाणे | बरे वोखटे सर्व कांहीं च नेणे ।। मुले खेळतां मायबापास चिंता । तयाचे परी बोलताहे विधाता ।। १९ ।। बहू स्तूति केली तया ब्रह्मयाने । कृपाळपणे वारिले राघवान ।। प्रसंगै विधीचे समाधान केले | मनी दुःख मागील ते सर्व गेले ।। २० ॥ पुढे बोलता जाहला बचपाणी । सदा सर्वदा गाइजे जो पुराणी ।। तया सूकृताचा बरा काळ आला । प्रभू रामचंद्रा तुझा योग झाला ।। २१ ॥ बहूतां परी राघवा ऐकलासी । पुरी पूरली लोचनांची असोसी ।। पुढे पाहतां देखतां रूप तुझें । जगन्नायका धन्य हे भाग्य माझें ।। २२ ।। उणे कोटि कंदर्प हे रूप साजे । सदा सर्वदा योगि ध्यानी विराने ।। मुनी शोधिती भक्त कोट्यानुकोटी । बहू साधने ही नव्हे शीघ्र भेटी ।। २३॥ कितीएक योगी उदासीन जाले । गिरी कंदरी तूज शोधीत गेले ।। तयां अंतरी भेटसी अल्प कांहीं। जनी आमच्या सुकृता पार नाहीं ॥ २४ ॥ म्हणे इंद्र तो स्वामि देवाधिदेवा । ननों सेवका आपुलासा म्हणावा ।। घडेना मला भक्तिभावार्थ नाहीं। प्रभ सांगिजे जी मुखें कार्य कांहीं ।। २५ ॥ म्हणे राम गा वजपाणी प्रसंगें । रथू मातळी धाडिला लागवेगे । बहदीस ओसडिले माय बाप-बहदीस हो शीणलों मायबा. f गाइजे जो-देव ऐकों. ११. कंदप-मदन,