पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. (८ ) पुढे जानकी रामभंकी विराजे । रमा आदिनारायणा जेवि साजे ।। असंभाब्य तो वाद्यकल्लोळ गाजे । कपीवाहिनी मानि आनंद माने ।। १०५ ।। ननाच्या मना कारणे धीर केला कृपेचा कृपासागरा पूर भाला।। कृपादृष्टिने पाहिले जानकीला । पढे शीघ्र भालिंगिले त्या सितला ॥ १० ॥ म्हणे दास हे लोक रामायणाचे । जरी अल्प सोपे चि नाना गुणांचे ।। कितीएक पाल्हाळ टाकोनि मागें । कथा चालिली ते पुढे कागवेगें ॥ १०॥ अकरावा प्रसंग प्रारंभ. प्रता दिनेतपाचा हुँताशू । विरांमानि ईशू सुरांचा सुरे» ।। मुनींचा महेशू महादेव धीरौं । सदांचा उदास बनारण्यवासू ।। १ ।। पिनाकी शुळी बोलिजे रुद्रवाणी । जटाभार पंचाननू शूळपाणी ।। हरू शैलजायल्लभू भक्तपाळ् । धराधार मृत्युंजयो तो कृपाळू ।। २ ।। महादेव शंभू गिरीजाविलासी | सुवर्णाचळामानि कैलासवासी । विराजे रुपे गौर कर्प जैसा । दिसे धाम ढीळा सदाशीव तैसा ।। ३ ।। विषे कंठ काळा दिसे चंद्र माळी । फेणीधारकू पन्हि साने कपाळी ।। असंभाव्य भोळा गळां रुंडमाळा । पहा मस्तकी वोघ नाती खळाळा ॥१॥ बसे भस्म अंगी प्रभू वीतरागी । उदासीन तो सर्व सामर्थ्य त्यागी ।। विधी शक हे सर्व ध्याती जयाला । महादेय तो वर्णितो राघवाला ॥५॥ म्हणे धन्य रामा विरा पूर्णकामा । असंभाव्य सीमा कळेना महीमा । महा थोर अद्भुत सामर्थ्य केलें । प्रतापे चि ब्रह्मादिकां सोरवीलें ॥६॥ तया रानणालयागं प्रसन्न आम्हीं । विरंचीवरें मातला पापकर्मी ।। ऋषी देव माझे बहू कष्टवीले । समर्था तुवां सर्व ही सोडपीके ।। ७ ॥ भखंडीत घेतो तुझे नाम वाणी । पुना अंतरामाने कोदंडपाणी ।। बहू काळ होते बहू आत पोटीं । प्रसंगें चि ये जाहली थोर भेटी॥ ८॥ अकस्मात हा भेटिचा लाभ जाला । मनामाजि अद्भूत आनंद जाला ।। सुरांकारणे संकटी पावलासी । मनोभावना राहिली तूजपाशीं ॥ ९ ॥ भविष्योत्तरे बोलिली वाल्मिकाने । पहातो चरित्रे तुझी आवडीने । विषे पोळला प्राण माझा निवाला । निजध्यास तो लागला पार्वतीला ॥ १० ॥ ८५. दिनेश-सूर्य. ८६. हुताश अग्नि. ८७. सुरेश= इंद्र. ८८. धीश-जुद्धीचा स्वामो. ८९. पंचानन पंचमखी. १०. शैलजावल्लभ-पार्वतोपति शिव. ९१. फणीधारक सर्प धारण करणारा. ९२. रुंडमाळा-मुंडक्यांच्या माळा. ९३. वीतरागी-वैराग्ययुक्त.