पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत मखें बोलती सर्व ही कोण वेळा। शिणे मारुती कंप जाला भुगोळा ।। ८९ ।। सभा बैसली त्या द्विजांब्राह्मणांची । असंभाव्य सौंदर्यता त्या सितेची || कितेकी मनामाजि संकेत केला । तिहीं अंतरी कल्पिले दोष तीला ।। ९० ॥ रघुनाथ हा हेत जाणे मनींचा । सदा सर्वदा साक्ष सर्वा जनांचा ।।। जिवांतील जाणे तया चोरवेना । महा पातकी पाप त्याचे सरेना ।। ९१ ।। म्हणोनी प्रसंगें उदासीन केलें । जनी कल्पिले सर्व ही व्यर्थ गेले ।। म्हणे राम तो जानकीलागि जावे । स्वइच्छासखे त्वां दिगंती फिरावे ।। ९२ ।। प्रसंगी तये शब्दकाठिण्य रामें । मखें बोलिने अर्थभेदें विरामे ।। अधोमूख सीता विलोकी भुमाते । मही भीजती जाहली अश्रुपाते ।। ९३ ॥ म्हणे न्याय अन्याय सर्वे बुडाला । दिसे आज कल्पतरू वांज जाला ॥ नसे अल्प अन्याय ब्रह्मांड केला । व्या दंड हा कोण धर्मे मिळाला ।। ९४ ॥ मनी अल्प हे कल्पना कां करावी । म्हणे कल्पिली बुद्धि पोटी धरावी ।। बहूसाल बोलोनियां काय आतां । महासौख्य ते पावके भस्म होतां ।। ९५॥ म्हणे जानकी त्या रिसां वानरांसी । बहसाल ते कष्ट जाले तुम्हांसी ।। परी मागुती एक जीवीं धरावें । बहसाल त्या पावका चेतवावे ।। ९६ ।। पुढे शीघ्र खाणोनियां कुंड केलें । असंभाव्य त्या पावका चेतवीले ॥ शिखा धांवती ऊर्ध्व आकाशपंथें । पिडा जाहली खेचरां भूचरांते ।। ९७ ।। विरंची हरादीक देवां समस्तां । मनामाने ते थोर जाली अवस्था ।। मुखे बोलती सर्व ही कार्य जालें । परी मागती काय हे विघ्न आले || ९८॥ स्वभाव चि हा वन्हि जाळीत आहे । तयामाजि हे जानकी कवि राहे ।। धडाडीत ज्वाळा पुढे पाहवेना । तया अंतरे ही उभे राहवेना ।। ९९ ।। मनामाजि पूजा यथासांग केली । पढे जानकी पावकामाजि गेली ॥ तये स्पर्शतां पावकू शुद्ध जाला । निवाला प्रसंगी तये शांत जाला ।। १०० ।। तयामाजि ते जानकी शोभताहे । समस्ती सभा लोक त्रैलोक्य पाहे ।। पी घालिजे पूतळी कांचनाची। तयेहनि ते दिव्य काया सितेची ।। १०१ ।। अळंकार चीरें बहू पुष्पमाळा | सगंधे तन चर्चली दिव्य बाळा ॥ . जगज्जननी शीघ्र बाहेर आली । सभे देखतां दिव्य सीता निघाली ।। १०२ ।। महावीर ते गर्जले नामघोघे । कपीवीर ते तोषले सर्व तोषे ॥ सुरी अंबरी पुष्पवर्षाव केला । नभी दंदुभी नाद कल्लोळ जाला ।। १०३ ।। सिता मुख्य ते पावकामाजि होती। वथा रावणे चोरिली हे वदंती ।। रमा सागरांतूनि नेली हरीने । तयाचे परी जानकी राघवाने ।। १०४ ॥ ८३. शिखा-ज्वाळा. ८१. वदंती वाता.