पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकोड. (७९) विधी शकते सर्व गंधर्व आले । ऋषी देव तेतीस कोटी मिळाले ॥ ७ ॥ मिळाले कपी रीस कोटयानुकोटी । सिता आणितां जाहली थोर दाटी ।। शतांची शते धांवती वेत्रपाणी । दळे वारिती गर्जती घोर वाणी ।। ७५ ।। पहाया सिता वीरमांदी मिळाली । प्रसंगी तये दाटणी थोर जाली ॥ बळे टाकिती एकमेकांसि मागे । कपी रीस ते धांवती लागवेगें ॥ ७६ ।। झडा घालिती एकमेकां पुढारें । दिसेना पदी सर्वसेना उभारे ॥ पुढे पाहया घालती मस्तकांते । महा वीर ते हाणिती वेत्रघाते ।। ७७ ।। कितीयेक आकाशपंथीं उडाले । कितीएक ते वृक्ष अनी दडाले ॥ कितीयेक ते फीरती अंतराळी | कितीएक ते घोष उल्हासकाळी ।। ७८ ।। कपांची दळे चंचळे फार जाली । महाभार देखोनि मागे पळाली । बळी गर्जती थोर घोषे फुराणें । वरी साधती अंतराळी किराणे ।। ७९ ॥ महाभार देखोनि माहा विरांचे | भ्रमों लागले भार गोळांगुळांचे ।। दिसेना सिता आर्त पोटीं सरेना । उतावीळ त्यां धीर पोटी धरेना ॥ ८ ॥ कपी धांवती शीघ्र पाहावयाला । परी रीघ नाहीं पढे जावयाला ॥ प्रसंगी महा भार देखोनि दृष्टी । रघुराज तो बोलिला एक गोष्टी ।। ८१ ॥ सिते कारणे वानरी कष्ट केले । किती वेळ हे बाणघातें निमाले ॥ उतावीळ पोटी पाहाया सितेला । दिसे स्पष्ट ऐसे करावे तियेला ।। ८२ ।। महोत्साव यात्रा तथा पर्वकाळी । विवाहीं यद्धांती तथा अंतकाळी ।। गृहीं सासऱ्याचे तया जन्नकाचे । नव्हे नित्य ते संगती नोवऱ्याचेd ॥ ८३ ॥ पुढे धाडिले शीघ्र त्या अंगदाला । म्हणे रे तया सांग बीभीषणाला ।। म्हणावे बळे आपुले लोक वारा । पढें शीघ्र येऊनियां दूरि सारा ।। ८४ ॥ त्वरें धांवला राव त्रीकटवासी । बह वारिलें मारिले राक्षसांसी ।। पुढे काढिले पै? कळा सकळा । दिसों लागली जानकी दिव्य बाळा ।। ८५॥ समस्ती सिता देखिली आदरेशी । असंभाव्य सौंदर्य लावण्यराशी ।। तये देखतां सर्व सूखे निवाले । कपी बोलती आजि निःपाप जाले ॥ ८६ ।। सिता देखती जाहली रामचंद्रा । ममस्कार केला तसा ची महेद्रा ।। तया राघवे पाहिले जानकीला । पढें भूलता वक्र अव्हेर केला ।। ८७॥ उदासीन ते जानकी लागि केले । सभामंडळी सर्व बेरंग जाले ।। सभेमाजि ते बोलती एकमेकां । सितेलाग अव्हरिले राघवे कां ।। अवस्था बहू लागली ते प्रसंगी । बुडाले कपी वीर सबै विरंगी ।। १. आर्त आवड. d नव्हे नित्य ते संगती नोवयाचे-नव्हे निंद्य ते संगतीने वराचे. १२. पट्ट-पडदे.