पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत महावीर ते शीच तैसे निघाले | दळेशी अशोकावनामाजि गेले ।। ५९ ।। बहूसाल यानें गजा घोडियांची । सवे चालिली दिव्य सखासनांची ।। महावीर ते सर्व येऊनि मागे । त्वरें वीर ते चालिले लागवेगे ।। ६० ।। पुढे भेटते जाहले जानकीला | नमस्कार साष्टांग केला तियेला ॥ अनूवादिजे शीघ्र नैऋत्यनाथें । तुम्हां न्यावया पाठवीलें समर्थे ।। ६१ ।। तरी जन्ननी शीघ्र आतां उठावें । महा मंगलस्नान आधी करावे ।। अळंकार चीरें पढ़ें सिद्ध केली । सगंधेल तेले बहू आणवीली ।। ६२ ।। बहूसाल आनंद तो जानकीला | स्तुती उत्तरी गौरवीले तयाला ।। म्हणे मारुती नन्ननी मान दीजे । उदासीन वीभीषणाला न कीजे ।। ६३ ।। कपी बोलतां मान्य ते गोष्टि केली । सवें राक्षसी शीघ्र तैशी निघाली ।। बहूसाल उष्णोदके सिद्ध होती । बह कुशळा राक्षसी माखिताती ॥ ६४ ।। स्तुती उत्तरी माखिले जानकीला । म्हणे आजिचा दीन हा धन्य जाला ।। चिरे सुंदरे कंचुकी रत्नमाळा । सुगंधी बहू घातल्या पुष्पमाळा ।। ६५ ।। अळंकार भांगरिजांबनंदाचे | महीमंडळींच्या नृपाळांस कैंचे। तया मारुतें बैसका सिद्ध केली । जगज्जननी बैसली सिद्ध जाली ।। ६६ ।। पुढे ठविले पात्र स्वाफळांचे । शकनार्थ द्यावे म्हणे रम्य वाचे ।। दिली पंचके दोनि दोवां जणाला । कपी मारुती आणि बीभीषणाला ।। ६७ ।। जिवाच्या सख्या राक्षसी जानकीच्या । बहू दीस होत्या वनी संगतीच्या ।। दिली पंचके दोन दोघी जणींना | महाशर्भ नामें तये वीजटेला ।। ६८।। म्हणे जानकी लोभ आतां असावा । उदासीन वाटे बहूसाल जीवा ।। समस्तां जणांत फळे पाठविलीं। मखें जानकीने बहू स्तूति केली || ६९ ।। फळे सेविली आच्मने शद्धि केली । पढे शीबिको ते विरें आणवीली ।। पताका चिरें सुंदरे दिव्य छेत्रे । पढे विजणे चामरे तेंवि चित्रे ।। ७० ।। दळे चालली दाटणी थोर जाली। सिता शीबिकेमाजि तैशी निघाली ।। तुरे सुंदरें गंभिरें वाजताती । असंभाव्य वाद्ये ध्वनी गर्जताती ।। ७१ ।। महा सुंदरें रम्य दिव्यांबरें तें । वरी सर्व आच्छादिले शोबिकते ॥ पुलस्ती कपी वीर सन्नीध जाती । पुढे वारिती वेत्र घेउनि हाती ।। ७२ ।। अशोकावनींहूनि ते लागवेगें । बहवीध सन्नीध येती प्रसंगें ।। समें चालिले लोक जीकूटवासी । पहाया अती आदरें जानकीसी ।। ७३ ।। समे बैसला देव कैलासवासी । गणाधीश तो ईश सर्वां गुणांसी ।। ७५. भांगार=सोनें. ७६. जांबुनद=सोनें. ७७. सुधाफळे-अमृतफळे आंबे. ७८. पंच के पांच फळांचा समुदाय. .७९. शिविका= पालखी. ८०. पुलस्तीपुलस्त्य पुत्र विभीषण