पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. करी खंड घेऊनिया सिद्ध जाला । सुखे चाकिला राम पाहावयाला ॥ ४४ ॥ जळाधीश नक्री समारूढ जाला । करी पाश तो शीघ्र घेऊनि आला || सर्वे सागरांचा समदाव आला । सखे चालिला राम पाहावयाला || ४५ ॥ निळा वर्ण तो वाय अंकशपाणी । मैंगारूढ होऊनिया नीळवर्णी || सताच्या गुणे आवडीने निघाला । सखे चालिला राम पाहावयाला ॥१६॥ गदा घेउनी तो प्रभू उत्तरेचा । हयारूढ तो शुभ्र वर्ण तयाचा ।। महा सुंदरू तो सुधारूप आला । सुखे चालिला राम पाहाक्ला ॥ ४७ ।। रूपें कर्दळीसूत तो शुळपाणी । जये अंतरीं रामरामेतिवाणी ॥ महादेव नंदीवरी रूढ जाला । सखे चालिला राम पाहावयाला || ४८ ॥ गणेशी गणाधीश अंकुशपाणी । चतुर्भूज तो भव्य सिंदूरवर्णी || महास्थूळ तो मूषकारूढ जाला । सुखे चालिला राम पाहावयाला ।। ४९ ॥ सुरांचा गुरू अगिरा दूसरा तो । प्रतापं कुबेरू धनाचा बळी तो ॥ रथारूढ होऊनि मार्तड आला । सखें चालिला राम पाहावयाला ॥ ५० ॥ विधा मुख्य हंसासनी सष्टिकर्ता । तयाचेनि उत्पती हा विश्वभर्ता ।। ऋषी देव गंधर्व मेळा मिळाला । सुखें चालिले राम पाहावयाला ।। ५१॥ गुणी नाचणी गायका स्वर्गवासी । अला कळा कुशळा त्या विलासी ।। दळे भूतळी चालिले देव कोटी । बहुतांपरी चालिले रामभेटी ॥ २२ ॥ सदाशीव तो शीघ्र भेटीस आला । पदींचालि तो राम सन्मूख आला ।। प्रितीने सखे भेटती एकमेकां । तया भेटतां सौख्य जालें अनेकां ।। ५३ ॥ विरंचीस आलिंगिल राघवाने । बहू सूख ते मानिले ब्रम्हयाने ॥ पुढे भेटला शक सूखे निवाला । तया मानसी थोर आनंद जाला ।। ५४ ।। ऋषी देव गंधर्व सर्वे मिळाले । पढे रामआलिंगनी सिद्ध जाले ।। समस्तांसि तो भेटला रामचंद्र । मही लोटला सर्वसूखे समुद्र ।। ५५ ।। सभा बैसली सर्वही स्वस्थ जाली । कथा राहिली पाहिजे चालवीली ।। रघुनायके मारुती पाठवीला । त्वरें शीघ्र लंकापुरी माजि गेला ॥१६॥ पुढे भेटला शीघ बीभीषणातें । बहसाल सन्मानिले मारुताते ।। तयालागि उंचासनी बसविलें । म्हणे आजि है भाग्य माझे उदेलें ॥ ५७ ।। सखा वाटसी राघवे धाडिलासी । बहसाल ते सौख्य जाले मनासी ।। प्रभूची मला काय आज्ञा करावी । शिरी वंदितो मी करन्यास दावी ।। ५८ ॥ पुढे मारुतें मात ते जाणवीली । म्हणे जानकी वैभवे आणवीली ।। ६९, खड़-तरवार. ७०. जळाधीश-वरुण, ७१. नक्र-मनर. ७२. मगहरण, ७३. उत्तरेचा पति सोम. 2. मातडसूर्य.