पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७६) श्रीरामदासकृत पढ़ें रावणानूज शृंगारवीला । विधायुक्त भद्रासनी बैसवीला ॥ २९ ।। धमामा नभी दुंदुभीनाद जाला | सुरी अंबरी पुष्पवर्षाव केला ।। रघुनायके सेवका राज्य दीले । सुरां सोडिले थोर आनंदवीलें ॥ ३० ।। असंभाव्य तो वाद्यकल्लोल जाला ! निशाणावरी तो विरी घाव केला ।। महावीर संतोषले राज्य तोषे । बहसाल ते गर्जती नामघोघे ॥ ३१ ॥ समस्तां जणांचे बहू पाप गेले | सुरांचे महा शल्य निर्मूळ केले ॥ यथासांग लंकापुरीते प्रसंगी | विरी वानरी पाहिली लाग वेगीं ।। ३२ ।। पुढे सर्व ही वीर तैसे निघाले । रघुनायका भेटले स्वस्थ नाले ।। समाचार ते सर्व ही सांगताती । जगन्नायका थोर आनंद चित्तीं ।। ३३ ।। म्हणे राम गा मारुती ये प्रसंगी। अशोकावना जाय तूं लागवेगीं ॥ समाचार सांगे तये सुंदरीला | कपी वीर तो शीघ्र तैसा निघाला ।। ३४ ।। अशोकी वसे जानकी शोक भारी | अकस्मात तेथे चि आला नारी ॥ नमस्कार घालुनि तो बोलताहे । सुवेळे समस्तांस कल्याण आहे ॥ ३५ ॥ दशग्रीव संहारिला लंकवासी । प्रताप दिले राज्य बीभीषणासी ।। प्रभूने समाचार हा सांगवीला । तेणे जानकी थोर आनंद जाला ।। ३६ ।। स्तुती उत्तरे बोलली एकमेकां । सिता तोषली दूरी टाकून शंका ।।। म्हणे मारुती हा समाचार नेतो । पढे जावया शीघ जाऊनि येतो ।। ३७ ।। नमस्कार केला तये जानकीसी । म्हणे रे कपी तूं चिरंजीव होसी ।। त्वरे चालिला भेटला राघवाला | पुन्हा मागुती पाठवीले तयाला ।। ३८ ।। म्हणे गा विरा सांग बीभीषणातें | वना जाऊनी आणिजे जानकीते ।। दिजे मंगळस्नान नाना प्रकारें । सुगंधे फुलेले अळंकार चीरे ।। ३९ ।। महा वीर ते शीव तैसे निघाले । पहाया सिता सर्व ही सिद्ध जाले ।। बहूसाल वायें दळेशी निघाले । कपी लागवेगी त्रिकूटासि गेले ।। ४० ।। सुवेळाचळामाज तो रामराजा । पहाया तया चालिल्या देव फीजा ।। मदोन्मत्त ऐरावतारूढ जाला । सुरांशी सुरेशू पुढे शीघ्र आला ॥ ४१ ।। पुढे शीघ्र मेष(रुढे पावकानें । करी शुभ्र शत्ती तया ताम्रवणे ।। बहू भूषणे देव तो अग्नि आला | सखें चालिला राम पाहावयाला. ।। ४२ ।। पहा दंडपाणी महामेघ नैसा । तयालागि बैसावया थोर म्हसा ॥ पती दक्षिणेची तयारुढ जाला । सखे चालिला राम पाहावयाल नरारूढ होऊनि नैऋत्यनायें । त्वरें जाइजे धुम्रवणे समर्थे ।। सत्ययुःखाचे कारण. ६५. वनारी-मारतो. ६३.मेष-मेंढा. ६७. म्हैसा रेडा. ६८, दक्षिणेचा पति-यम.