पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. (७५) महादूत वेगी पुढे पाठवीले । बळें शीध लंकापुरीमाजि गेले ।। त्वरें लाविले काम पूर्वीच तीहीं । बह वेग त्या राक्षसां वानरां ही ।। १६ ।। बहूसाल कॉमौर ते लक्ष कोटी । स्थळे सिद्ध होता असंभाव्य दाटी । प्रसंगी तया तातडी फार जाली । पहाया सुखे लोकमांदी मिळाली ।। १७ ।। शिड्या पायिंच्या उंच आकाशपंथें । असंभाव्य तें लागले काम तेथें ।।। बहू जाणते वगे मोठ्या बळाचा । पुरमिाजि तो एक मेळा तयांचा ।। १८ ।। कपीच्या करें अल्पशी भन्न जाली । पुरी मागुती सर्व ही सिद्ध केली ।। त्रिकूटाचळी भव्य चत्वार द्वारें । विशाळे नभा सारिखी थोर थोरै ।। १९ ।। दिसे रम्य लंकापुरी कांचनीची । बरी पाहतां हांवे पूरे मनाची ।। हुँडे कोट गेले नभामाजि उंची । जगी धन्य निर्माण केली विरंची ॥ २० ॥ पहाया गॅवाः लघू दीर्घ द्वारे | बहूसाल जाळघरे थोर थोरें ।।। असंभाव्य चर्या गिरी तो विलासे । वरी सर्व रेवाटिले व्योस भासे ।। २१ ॥ हुडे कोट दामोदरे थोर थोरें । सजे b बाहुड्या चौक नाना प्रकारे ।। महा मंदिरे सुंदरे थोर थोरे । भुयेरें बरी वीवरे ती अपारे ।। २२ ।। बहू चित्रशाळा बह होमशाळा । बहू सुंदरा धर्मशाळा विशाळा ।। तके थोर वृंदावनें पौर ओटे । सभामंडपी देखतां सौख्य वाटे ।। २३ ।। बिदी" हाट बाजार माझ्या दकाने । मन्या पर्णशाळा महा यागस्थाने ।। वने वाटिका जीवने वोध जाती । झरे कालवे वाहती पाटजाती ।। २४ ।। ध्वजा गोपुरे शीखरे ती अपारे । बह देव देवालये थोर थोरें । तळी कूप बावी जळें पर्ण जाली । बहता परींची स्थळे सिद्ध केली ।। २५ ।। बळी झाडिती लोटती सर्व शाळा । सडे शिंपिती घालिती रंगमाळी ।। सुगंधी बहू गुंफिल्या पप्पमाळा । जळे निर्मळे बेसका त्या सुढाळा ॥ २६ ॥ सुवर्णाचिया रत्नमंडीत भिंती । हिरे पाच गोमेद ते ढाळ देती ।। स. शिंपिले कस्तुरी केशरानें । बहसाल ती रम्य याने विमाने ।। २७ ।। ध्वजा त्या गुढ्या तोरणे ऊभवीली । पुरी सर्व शृंगारमंडीत केली ।। पताका निशाणे बरी दिव्य छने । बह चामरे दिव्य मार्तडपत्रे ।। २८॥ तया राजद्वारी बह दाटि जाली । सभामंडपी मंडळी ते मिळाली ।। ५२. कामार-मजरदार. ५३. लोकमांदी लोकसमूह. ५४. कांचनाची=सोन्याची. ५५. हाव इच्छा. ५६. हुडे-बुरूज. ५७. विरंचोब्रह्मा. ५८. गवाक्षे खिडक्या. ५९. जाळं- धर-जाळ्या. बाहड्या-चावड्या. ६०. पार=पिंपळ वड इत्यादिकांस सभोंवती जो वर्तुलाकर किवा अष्टपैल ओटा बांधतात तो. ६१. बिदी गल्लया. c माड्या-मंड्या. ६२. रंगमाळा-रांगोळी. ६३. मार्तड पत्रे छत्रया.