पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बारामदासस्वामाचे चरित्र. श्रीरामदासस्वामींचे चरित्र. (७) शिंगणवाडी, व बाहें या ठिकाणी अकरा मारुतीची स्थापना करून त्यांनवर भीमरूपी स्तोत्रे रचिली. १ दासबोध, २ श्लोकबद्ध रामायण, ३ मनोबोध, ४ सगुणध्यान, ५ निर्गुणध्यान, ६ मानसपूजा, ७ एकवीस समासी, ८ आत्माराम, ९ पूर्वारंभ १० जुनाट पुरुष, ११ गोसावी, १२ करुणाष्टके, १३ षड्रिपु, १४ अंत भोव, २५ भीपरूपी स्तोत्रे, १६ पंचमाने, १७ सप्तपंचचतुः १८ अभंग- १९ पंचसमासी, २० कौल इत्यादि ग्रंथ स्वामींनी केले. त्यांपैकी पहिले दोन मोठे आहेत. दासबोध ग्रंथ स्वामींनी गतकाल वर्ष ४७६० म्ह० शा० श० १५८१ या वर्षी केला, याविषयी त्याच ग्रंथांत पुढील वचन आहे:- चार सहस्र सातशे साठी, इतुकी कलियुगाची रहाटी। उरल्या कलियुगाची गोष्टी, ऐशी असे || ७ ॥ चारी लक्ष सत्तावीस सहस्र, दोनशे चाळीस संवत्सर । पुढे पुढे अन्योन्य वर्णसंकर, होणार आहे ।। ८ ॥ दशक ६ समास रामायणाची जितकी कांडे आम्हांस मिळाली तितकी या पुस्तकांत छापिली आहेत. बाकीची मिळाल्यास छापूं. आत्माराम ग्रंय स्वामींनी दासबोधानंतर केला असा त्याच ग्रंथांत एका ठिकाणी उल्लेख आहे:- दासबोधींचे समासी, निर्मल केले मीपणासी । त्या निरूपणे वृत्तीसी, पालट दिसेना ॥ २० ॥ आत्माराम समास १. स्वामींच्या शिष्यवर्गात भक्का, वेणू, बहिणाबाई व सतीबाई या स्त्रिया प्रसिद्ध आहेत. तत्कालीन कुटिल लोक या स्त्रिया बरोबर ठेविल्यामुळे स्वामीस क्वचित् दूषण देत. परंतु एकंदरीने पहाता त्यांचे साधुत्व ढळल्याचे ऐकिवांत नाही. स्वामींनी अनेक अद्भुत चमत्कार केले असे त्यांच्या चरित्राच्या छापील बखरीत आढळते. ते हल्लीच्या पिढीस सत्य वाटणारे नाहीत. तथापि येथे काही चमत्कारांची एक यादी मासल्याकरितां देतो.:- १. दशपुत्री बाईचा नवरा जिवंत केला. २. काशी येथील विश्वेश्वराचे लिंग काही वेळ अदृश्य केले. ३. पैठणांत मृत घार उठविली.१. मातोश्रीचे गेलेले नेत्र सिद्धाईचे योगाने परत आणिले. ५. सती बाईस जाळीखाली अन्नसामग्री. २०. ठाणे येथे सूर्योदय छापखान्यांत सन १८७१ छापलेले चरित्र पृष्ट ७६ पहा. २१. यांपैकी दासबोध ग्रंथ वेगळा छापून प्रसिद्ध झालेला आहे. आणि ७, १.३० 5६,१७, खेरीज बाकीचे नित्यनैमित्तिक विधिसंग्रह सोपान नामक शाश० १८०१४ झामप्रकाशांत छापलेल्या पुस्तकांत छापिले आहेत.