पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासस्वामींचे चरित्र. लग्नकार्याहून परत येत असतां मौजे दहीलवाडा येथे शा० श० २५९९ फाल्गुन वद्य १३ सह १४ रोजी श्रेष्ठ परलोकवासी झाले. त्यांस रामचंद्र व श्यामजी असे दोन पत्र होते. त्यांची पत्नी पार्वतीबाई व०३० स सती गेली त्या वेळी रामचंद्रपंतांचे वय १२ वर्षांचे होते व श्यामजीबाबांचे १० वर्षांचे होते. शा० श० १६०० चैत्र श०१३ स उद्धव गोसावी यांअबरोबर समर्थांनी उभयतां मुलांस श्लोकबद्ध पत्र पाठविले. पुढे त्याच वर्षी प्रतापगडचे देवीस आईने पुत्र व्हावा म्हणून केलेला नवस फेडण्याकरितां समर्थ गेले तेव्हा देवीचे मस्तकी सोन्याचे फूल वाहन त्यांनी देवीवर अनुष्टुभ् छंदांत स्तोत्र रचि- लें. नंतर शिवाजीमहाराजांचे आग्रहावरून सयर्थ मुलांसह प्रतापगडास जाऊन परत आले. त्याच वर्षी चैत्र २०१४ सह ३० स वेणूबाई परलोकी गेली घ उद्धव गोसावी उभयतां मुलांस जांबेस पोचवून माघ व० १ स परत आले. त्याच वर्षी शिवाजीमहाराजांनी ३३ गांव इनाम, कांही गांवीं नमीन, व १२१ खंडी गल्ला इतकी नेमणूक चांफळ संस्थानाकडे करून दिली. पुढे शा० श० १६०१ त समर्थ तंजावर प्रांती व्यंकोजी राजे यांचे आमंत्रणा- वरून गेले तेव्हां अरणीकर कारागिरास श्रीराम, लक्ष्मण, सीता, व मारुती अशा चार मूर्ति उत्तम करण्याविषयी त्यांनी सांगितले. नंतर तिकडून परत आल्यावर डोमगांवों मठ करून त्यांत कल्याण गोसावी यांची स्थापना स्वामींनी केली. पुढे शा० श० १६०२ रौद्रनामसंवत्सरी चैत्र शु. १५ रविवारी शिवाजीमहाराज परलोकी गेले. नंतर संभाजी राजे अविचाराने वागू लागले हे पाहून समर्थांनी त्यांस शा० श० १६०३ या वर्षी एक बोधपर ओवीबद्ध पत्रे लिहिले. त्याच वर्षी माघ व. ५ स चंदावराहून मूर्ति आल्या. नंतर व. ९ मंदवारी समर्थ परलोकीं गेले. आपल्या पश्चात् श्रेष्ठांच्या मुलांस अधिष्ठानी स्थापावे अशी आका व उद्धव यांस पूर्वीच आज्ञा स्वामींनी केली होती. स्वामींच्या देहाचे बिल्वकाठे व तुलसीकाष्ठे यांचे योगाने शिष्यांनी दहन केले, स्वामींनी शहापूर, मसूर, चांफळ, उंब्रज, माजगांव, शिराळे, पाडळे, पारगांव, १५. ठाणे येथे सूर्योदय छापखान्यांत सन १८७१ त छापलेले चरित्र पृ० ३२३ पहा. १६. कित्ता पृष्ट ३३६-३३७ पहा. १७. या बाईच्या निति रामनामक ओवीबद्ध ग्रंथाचा काही अंश आमचेकडे छापण्या- करितां आला आहे. १८. हे गांव सोलापूर जिल्ह्यांत सीनानदीचे कांठी आहे. १९. ठाणे येथे सूर्योदय छापखास्यांत सन १८७१ त छापलेले चरित्र पृष्ठ ३४८-३३९