पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासस्वामींचे चरित्र दाखविली. ६. अंबाजी ऊर्फ कल्याण हा विहिरीत पडला असता त्यास वाचविल ७. अंगापूरच्या रानातल्या मूर्ति नेण्यास लोकांनी हरकत केल्यामुळे त्या अति नड केल्या. ८. शिवाजी महाराजांस स्वप्नांत खराखुरा नारळ दिला शा० श० १५७१. ९. जुन्याच्या मोगरीच्या कळ्यांची मोत्ये केली. १०. शिवाजीमहाराजांच्या २००० सैन्यास सिद्धाईच्या बळाने जेऊ घातले. ११. पंढरीची अयोध्या केली. १२. कुबडी. ने पाण्याचा झरा उत्पन्न केला. १३. कल्याणा करितां कित्ता घळीत उत्पन्न केला. १४. खार्मीस कोप आल्यामुळे पाडळीस आग लागली. १५. तो शांत होतांच ती वि. झाली. १६. मातापूर येथे ब्राह्मणांस दत्ताचे साक्षात दर्शन करविले. १७. इंदरास पर्जन्य वृष्टि पाडली. १८. तंजावर येथे वीर्य पात्रांत सोडिले व परत घेतले. १९. मिरजेच्या किल्याचे बारीक जंगीतून गेले. २०. आंगांतले हीव छाटीत ठेवले. २१. अंत्यजास ब्राह्मण बनवून त्याजकडून सदाशिवशास्त्रयाचा गर्व परिहार केला. २२. राजापूरकर मंजे यांस समुद्रांत वांचविले. २३. ब्राह्मणांस दक्षिणा दगड दिले होते त्यांचे साने केले. २४. पाण्याने भरलेल्या घागरीत तप उत्पन्न केले. २५. अरणी येथील अंध कारागिरास डोळे दिले. स्वामींच्या चरित्रांच्या दोन गद्य बखरी आमच्या पहाण्यांत आल्या आहेत. त्यांपैकी एक गणपतकृष्णाजीचे छापखान्यांत शा० श० १७९२ त छापलेली आहे व दुसरी सन १८७१ त ठाणे येथे सूर्योदयांत छापलेली आहे. या खेरीज संतविजयाचे पहिले २५ अध्यायांत ताहराबादकर कवि महीपति याने स्वामींचे ओवीबद्ध चरित्र सविस्तर लिहिले आहे. तसेच भक्तविजयाच्या ४७ व्या अध्यायांत संक्षेपानें महीपतीने स्वामींचे चरित्र लिहिले भआहे. मोरोपंत पराडकर यांनीही रामदासगुणवर्णन ह्मणून एक आर्याबद्ध प्रकरण लहानसे लिहिले आहे ते माधवचंद्राबाचे सर्व संग्रहांत छापलेले आहे. विठोबा अण्णा कन्हाडकर यांनीही सुश्लोक लाघवांत ३३२ श्लोका- पासून ३५२ श्लोकापर्यंत स्वामींचे संस्कृत भाषेत सुरस चरित्र लिहिले आहे, तेही या काव्येतिहास संग्रहांत प्रसिद्ध झालेच आहे. आम्ही वर जे चरित्र लिहिले आहे ते ठाणे येथे छापलेल्या विस्तृत बखरीच्या आधारे मुख्यत्वे करून लिहिले आहे, * अनंतकवीने रामदासस्तुतीवर साहा श्लोक केले आहेत ते अजून पर्यंत कोठे छापून प्रसिद्ध न झाल्यामुळे येथे देतो:- रामदासस्तुति. निर्माणस्थळ गौतमी परि महा कृष्णातिरी जो वसे ।

  • मिलंगाबादेस अनंत गोसावी या नावाने प्रसिद्ध असा रामदासस्वामींचा शिष्य स्वा-

मीचे आज्ञेवरून मरबांधून रहात असे. याविषयी अशी आख्यायिका आहे की, त्या