पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७४) श्रीरामदासकृत प्रसंग दहावा. तया रावणालागि देहांत आलें । प्रधानासि बीभीषणे पाठविले ।। तुम्हीं शीघ्र अंतःपुरामाजि जावे | समस्तांसि तात्काळ घेऊन यावे ।। १ ।। प्रभू बोलतां वीर तैसे निघाले । पुढे शीघ्र अंत:पुरा माजि गेले । समस्ता वधू मार्ग लक्षीत होत्या । उदासीन उद्विग्न चिंतातुरा त्या ।। २ ॥ तंव देखिले ते अकस्मात डोळां । भयातुर त्या कंप सूटे चळाळा ॥ तयांमाजि मंदोदरी मुख्य नारी । तये सांगती हो निमाला सुरारी ॥ ३ ॥ प्रसंगी तये थोर कल्लोळ जाला । दुखामाजि तो सौख्यसिंधू बुडाला ।। भुमी लोळती रूदती एक वेळा । देहे व्यस्त हाणोनि घेती कपाळा ।। ४ ।। समस्तांजणींचे महा शब्द जाले । दुखाचे तया योग सर्वे मिळाले || मुखे बोलती थोर कल्लोळ जाला । समस्तां सुखांचा अळंकार गेला ।। ५ ।। धुळी टाकिती ऊर हाणन घेती। धरना असंभाव्य जाली रुदंती ।। चिरे फाडिती ते अळंकार गेले । भूमी लोळती मोकळ केश जाले ।। ६ ।। पुढे सर्व राजांगना त्या निघाल्या । दशग्रीव जेथे रणामाजि आल्या ।। रणी कांत देखून आकांत केला । बह पाप हो बोखटा काळ आला ।। ७ ।। अकस्मात ते सर्व सौभाग्य गेले । समर्था प्रभू कां उदासीन केले ।। समस्तांसिं शोकार्णवीं बडवीलें । असंभाव्य हे दुःख टाकान आले ।। ८ ।। म्हणे राम बीभीषणा जाय आतां । बहूतां परी तोषवावे समस्तां ।। निमाल्यावरी वैर कां हो करावे । विवेके चि मंदोदरी नीववावें ॥ ९ ॥ कृपासागरें वीर तो पाठवीला | अकस्मात राजांगनांमाजि आला ।। प्रबोधे चेि नानापरी तोष केला | समस्तीजणीं भूयना पाठवील्या ॥ १० ॥ पुन्हा मागुती वीर तात्काळ आला । म्हणे हो प्रभू पाठवीले तयांला || चदे मागुता राम बीभीषणाला । रणी रावण अग्नि द्या जा तयाला ॥ ११ ॥ पुढे ऊठला तो रणामाज आला । हताशी तया शवणा वीधि केला ।। समुद्रीं शुचिश्मंत होऊनि आला । नमस्कार केला तया राघवाला ।। १२ ।। वदे राम तैसा चि त्या बांधवाते । कपीनाथ सुग्रीव राजा तयाते ।। तुम्हीं शीघ्र नैऋत्यनाथासि न्यावें । विधीयक्त भद्रासनी बैसवावे ।। १३ ।। महा वीर तीही नमस्कार केले । पढें सव्य घालनि तैसे निघाले ॥ सवे चाललो ते असंभाव्य सेना | ऋषी देव ते रूढ जाले विमाना ।। १४ ।। बहूसाल वाद्यध्वनीघोष जाला | बळी गर्जती नाद गेला भुगोळा ।। कपीनाथ सौमित्र ते राजभारें । दळे चालिली वानरांची अपारे ।। १५॥ ५१. भद्रासनी-सिंहासनावर.