पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. तुरे वाजती अंबरी" शंख भेरी । जयो पावला राम लीलावतारी ।। सुरां मानसी थोर आनंद जाला । महा घातकी रावण तो निमाला ।। ८९॥ समस्तां सुरां मानसी सौख्य जालें । परी दुःख बीभीषणा प्राप्त जाले ॥ रणी रावण श्रेष्ठ बंधू निमाला | झळंबे मनी शोक उत्पन्न जाला ।। ९० ॥ रुदंती प्रसंगी ध्वनी घोष जाला | झळंबे मनी दुःख बीभाषणाला ।। अहा हो अहा हो मखी बोलताहे । विलापे चि तो श्वास टाकीत आहे ।। ९१ ॥ बहू लोटले बोघ नेत्रोदकाचे । दिनासारिखे शब्द कारुण्यवाचे ॥ घडीने घडी तो भुमी अंग घाली । अरे भ्रातया शुद्धि सर्वे उडाली ।। ९२ ।। दहभाव सांडून तो रूदताहे । मोहोजाळ होतां चि आनंदताहे ॥ बहूतां परीचें बह सौख्य दीलें । मनामाजि ते सर्वही आठवीले ।। ९३ ।। मुखे श्वास सोडूनि पाणी चुरीतो । भुमी मस्तकू आपटीतो पिटीतो ।। म्हणे वीर तो वोखेटा काळ आला । त्रिकूटाचळाचा अळंकार गेला ॥ ९४ ॥ नव्हे रावणासारिखा संपतीचा । नव्हे रावणा सारिखा वित्तीचा ।। बह सांगतां वैभवालागिं कांहीं । प्रतापी तया सारिखा वीर नाहीं ।। ९५।। मनाचा उदारू धनाचा कुबेरू | बहूसा विचारू जगी दानशूरू ।। गळाला बहू धीर त्या राक्षसांचा | महीमंडळी धाक गेला सुरांचा ॥ ९६ ॥ बहू तां जनाचे बह भाग्य गेले । गमे सर्व ब्रह्मांड हे वोस जाले ।। जया कारणे देव लीलावतारी । तयाच्या गुणा तुळणा कोण सारी ॥९७॥ उदासीन वाटे जनी पाहवेना । मना स्वस्थ नाहीं तया राहवेना ।। गताचे गुणे वीर तो मग्न जाला । तयालागि वारावया राम आला ।। ९८॥ उभा चापपाणी वदे रम्य वाणी । सदा सर्वदां गाइजे जो पुराणी ॥ म्हणे गा विरा थोर आश्चर्य जाले । मोहोसागरी ज्ञानतारूं बुडालें ॥ ९९।। तयासारिखें आजि हे दीसताहे । प्रभू बोलतां वीर तात्काळ राहे ।। करा घेतले शीघ्र बोभाषणाला । कृपाळ दिनांचा दळामाजि आला ॥ १० ॥ म्हणे राम बीभीषणा बद्विवंता । रणी रावणालागि देहांतवेथा ।। तुम्ही शीघ्र आतां पुरामाजि जावें । समस्तांसि पाहावया आणवावें ॥ १०१ ॥ समर्था मनी लागली सर्व चिता । परी अंतरा जाणतो सौख्यदाता ।। तयाची कथा ऐकतां दःख नासे । चरित्रे बरी अंतरी दास तोषे ॥ १०२ ॥ 8. अंबरों-आकाशांत,४८. पाणी-हात. १९ वोखटा वाईट, ५. वित्पतीचा-शहाणा.