पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत बळे सोडितां शक्ति ने सरारी । महा वात प्रख्यात पिच्छी भरारी ।। मही सप्तपाताळ घोघे गरारी । पळाली भुते काळ पोटी थरारी ।। ७५ ॥ फैणी कूर्म वाराह चक्कीत जाले । विमानाहुनी देव ऋषी पळाले । ग्रहो सोम सूर्यादि पोटी गळाले । कपी खेचरां दिग्गजां कंप जाले ॥ ७६ ॥ प्रसंगी तये थार उत्पात जाला । नींशोणिताचा बळे मेघ आला ॥ धुमारा बह दाटलासे दिगंती । असंभाव्य ते ऊलकापात होती ।। ७७ ।। बळे कोपले रुद्र काळामि जैसे । अरीराय ते मातले भीम तैसे ।। तयां झंजतां कोण कोणा निवारी रणी भीडती काळ कोदंडधारी || ७८ ॥ रिपू सोडिती घोर शस्त्रे झणाणा | बळे वाजती बाणभाळी खणाणा ।। बहूसाल स्फुल्लिंग जाती फणाणा । महीमंडळी घोष ऊठे दणाणा ॥ ७९ ॥ महाशक्ति ते काळरूपें कडाडी । असंभाव्य ते ज्वाळवन्ही भडाडी ।। मही मेरु मंदार घोष गडाडी । बळे शोषला सिंधु पोटी तडाडी ।। ८० ॥ पुढे राघवें लक्षिलें रावणातें । बळें मस्तके तोडिली बाणघातें ।।। गिरीशीखरांचे परी ती विशाळे । पुन्हा नीघती कंठनाळे ढिसाळे ॥ ८१ ।। शिर देखतां राम चक्कीत जाला । ह्मणे मृत्यु नाही गमे रावणाला ॥ वदे मातली स्वामि देवाधिदेवा । सुधाक्क्ष भेदून शत्रू वधावा ।। ८२ ।। कपी फोडिली वाणघातें निघातें । तयें रावण चालिला मृत्युपंथें ॥ ऋषी देव गंधर्व ते सर्व तो । विमानी सुखें गर्जती नामघोषे ।। ८३ ॥ नभी दुंदुभी वाजती एकनादें । बहूतांपरीची बहूसाल वायें । ध्वनी दाटले पूर्ण ब्रम्हांड घो। कपी गर्जता नामघोषे विशेषे ।। ८४ ॥ सुखानंद आनंदली सर्व सृष्टी । विमानाहुनी जाहली पुष्पवृष्टी । ऋषी देव गंधर्व सर्वे मिळाले । विणे लाउनी नारदादीक आले ।। ८५ ॥ मिळाल्या सुखे नायिका अष्ट भावे । करी ताळ मुर्दैग वीणे स्वभावे ।। कळा कौतुकें दाविती ते प्रसंगी । गणी नांवेणी नाचती रागरंगों ॥ ८६ ॥ बहू गायनें थोर गंधर्व गाती । कळा ऐकतां देव थकीत होती ॥ जयाच्या अलापे देहभाव जाती। मगे श्वापदें लाभल्या त्या द्विजाती ।। ८७ ॥ रुपें सुंदरी किंनरी दिव्य यंत्रे । बहू साल विद्याधरी गूणपात्रे ।। उठे रागकल्लोळ सप्त स्वरांचा । गमे वोळला मेघ हा अमृताचा ।। ८८ ॥ ३७. फणी-शेष ३८. खेचर=आकाशांत फिरणारे गंधर्वादि.३९. शोणितात. 2. नभी शोगिताचा बळें मेघ जाला-नदी शोणिताचा बळे पूर आला. १०.बाणभाळी-बाणांचा समह.४१. स्फुालग-ठिणग्या.१२. सिंध-समद्र. ४३. सुधा-अमत.28. नायिका अ- प्सरा. १५. नाचणी नाचणान्या कळपांतिणी. १६. द्विजातों-पांखरें.