पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. असंभाव्य त्या राक्षसा कोप आला । बळे टाकिले शीघ्र तेणे शुळाला ॥ रणीं फोडिली हाक नैऋत्यनाथें । म्हणे शूळ आला प्रभो व्योमपंथें ।। ६० ॥ बहू बाणसंभार जातां जळाला । पुढे शूळ पाशुपते भग्न केला ॥ पुन्हा राघवे थोर संधान केले । असंभाव्य ते पोकळीमाजि नेले ॥ ६१ ॥ सेरेशे गिरी फोडिला वजघातें । तयाचे परी भेदिले रावणातें ॥ देहे खीळेला बाण पैलाड गेला । महीमंडळामाजि जातां निवाला ॥ ६२ ॥ पुन्हा सोडिली राघवे बाणजाळे । बहुसाल सूसाटती अंतराळे ।। रथी खीळिला प्राण व्याकूळ जाला । बहु मूर्छना सांवरेना तयाला ॥ ६३ ॥ रिपू भेदिला थोर लसून वमें | उभा राहिला राम तो वीरधर्मे ।। रथू सारथी शीघ्र घेऊनि गेला । पुढे शुद्धि जाली तया रावणाला।। ६४ ॥ बहू कोप आला तया रावणासी । म्हणे सारथ्या तूं भयातूर होसी ॥ र) काढिला कां तुवां लागवेगी । न येतां उणे दीसते या प्रसंगी ॥ ६५ ।।। म्हणे सारयी स्वामिया हो उदारा । रिपू पेटला तो रणी घोर मारा ॥ रथारूढ राया तुम्ही वीकळांगें । म्हणोनी रयू काढिला लागवेगे ॥ ६६ ॥ तये बोलतां राव संतुष्ट जाला । समीतसे हार्तिच्या कंकणाला ॥ बहू वेग केला तया लंकनाथें । रयू फीरवीला रणाचेनि पंथें ।। ६७ ॥ रणी माजल्या त्या बहू प्रेतराशी । पुढे जावया बाट नाही रथासी ॥ भूमी दाटली मेदैमासे अचाटे । राँगे बळें वाजती चर्चराटें ।। ६८ ॥ समारंगणी रावणू शीघ्र आला । वदे घोरवाणी तथा राघवाला ॥ उलंघी सिमा शीघ्र मृत्यू जयाला । रणी कोण लेखी तुला मानवाला ।। ६९ ॥ असंभाव्य तो रावण बाण सोडी । नभी पांकडीचे परी ते झडाडी ।। उफाळे बळें धांवती दिव्य घोडे । रथामाजि संघट्टणी घोष गाढे ॥ ७० ॥ धुरा ऊलयो पाहती शीघ्र मागे । विरी वोदिले बाण ते लागवेगें ॥ रथामाजि तो पैस ऊदंड जाला । विरां मागुता थोर आवेश आला || ७१ ।। रणी राघवा रावणा युद्ध काळू । रिपूभारसंहार भूतां सुकाळू ॥ करी चंड कोदडै मंडीत बाणीं । उभे राहिले वीर ते बवठाणी ॥ ७२ ॥ रणीं येकमेकांसि ते घोर शब्द । बहु भाषणे त्रासती वीर द्वंद्वे ॥ बळें धांवती क्षोभले वीर कोधे ॥ पुढे मारिती शस्त्र क्रोधे विरोधे ॥ ७३ ।। रणी लोटला राम हा सूर्यवंशी । महायुद्ध आरंभिले रावणाशी ॥ उभे राहिले काळकृत्तांत जैसे । महावीर त्यां घोर आकांत भासे ।। ७४ ।। ३० नैकत्यनाथ राक्षस. ३१. पाशुपत यानावाचे अस्त्र. ३२. सुरेश इंद्र. २३. मेद चरवी. ३१. रथांगें-वाकें. ३५, लेखा-हिशेव. ३६. कोदंड-धनुष्य.