पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७०) श्रीरामदासकृत पुढे ऐकतां राम बोले तयासी । म्हणे ऐकरे रावणा गर्वराशी ।। असंभाव्य रे वैभवे मातलासी । मराया रणी आनि तूं पातलाशी ।। ४५॥ म्हणे राम रे रावणा वीरधर्मे । रणामाजि मी तूज मारीन नेमे ।। पळालासि कोठे तरी हे सुटेना | तुझी मृत्युवेळा कदां पालटेना ।। ४६ ।। रिपू जाणरे तूजला मृत्यु आला | दिल्हे अक्षयी राज्य बीभीषणाला। सिते कारणे थोर कापट्य केलें । अभाग्या तझे सर्व ही राज्य गेलें ॥ ४७ ॥ तये बोलतां कोपला वीर गादा । रणामाजि त्या घर्डिल्या वजदाढा ।। पुढे शळपाणी करी सज्ज मेढा | बळे वोदितां चकला राम वोढा ।। ४८ ।। कडाडीत घोघे रणी तेचि काळी । रघूनायका बैसला बाण भाळी ॥ असंभाव्य तो कोपला चापपाणी । दशग्रीव तो छेदिला शीघ्र बाणी ।। ४९ ।। बळें मारिती वारिती बाणजाळे | पुन्हा क्षोभले धांवती ते उफाळे ।। रिपू कोपला थोर काळाग्नि जाला । तया रावणा थोर आवेश आला ॥ ५० ॥ प्रतापे रणी राघवे एकवेळे । बळे फोडिली बाणघातें कपाळे ॥ रथी सारथी पाडिले अश्व जे कां । चिरे नीकुरे भेदिले एकमेकां ।। ५१ ।। बळे छेदिता जाहला वोष्ट दंती । बहू बाण ते सोडिले व्योमपंथीं ।। कितीएक ते राघवे चूर्ण केले । कितीएक ते बाण अंगी बुडाले ।। ५२ ।। तया देखतां रावणू हाक फोडी । असंभाव्य ते मागुते बाण सोडी ।। बळे अश्व ते मातली भग्न केला । ध्वजस्तंभ तो शीघ छेदून नेला ॥ ५३ ।। भयातूर ते भार गोळांगुळांचे । ऋषी देव गंधर्व इत्यादिकांचे ॥ रणी आगळे दाखवी लंकनाथू । भये बोलती मांडिला की अनयूँ ।। ५४ ॥ पडे मातली अश्व ते पळवीले । ऋषी देव गंधर्व साशंके जाले || कपी बोलती मांडले चिन्न हे की। रणामाजि त्या रावणे जिकिले की ।। ५५ ॥ अगस्ती ऋषी तो रणामाजि आला । रणी मंत्र सांगे तया राघवाला ।। जपे आदरे राम तो मूळ मंत्र । रवी शीघ्र येऊनि दे सारशस्त्रे ॥ ५६ ।। ह्मणे राघवा जिकिशी रावणाला । अती काळ हा वेळ नाही तयाला ।। पुढे राघवे विधिले पंच बाणीं । तुरंग रणी पाडिले दैन्यवाणी ।। ५७ ।। रणी राघवे चूर्ण केले रथाचे | बळे ऊसने घेतले मातलीचें ॥ विरे सारथी धाडिला मृत्युपंथे । ध्वजस्तंभ तो पाडिला बाणघाते ।। ५८ ॥ पुन्हा राघवे मागुती तेचि काळीं । रिपू भेदिला बाणजाळी कपाळी || सुरां देखतां योर आनंद जाला । महद्भूत तो वानरी घोष केला ।। ५९॥ २७. शूळपाणो शुळ आहे हाती ज्याच्या असा. २८. गोलांगुल वानर, २९ साशंक- भयाभीत.