पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकोड, बुधा मंगळा थोर आकांत आला । शनी सोम तो आपधाके पळाला ॥ ३०॥ ग्रहानेंग्रह भतलाप्रत आले । विमानाहुनी देव धाके पळाले ॥ दिशा दिग्गजा व्यापिलें अंतकाळे । चळी द्वि वळी कांपतो ते चळाळे ॥ ३१ ॥ महावीर ते मातले घोर मारें । दिशा दाटल्या व्यापिले अंधकारें ।। पुढे पाहतां येकमेकां दिसेना । ध्वनी मातली ऊठले घोष नाना ।। ३२॥ महावीर दोघे रणी स्तब्ध जाले । पुढे पाहतां बाण बाणी गळाले ।। पुन्हा मागुती हाणिती एकमेकां । भरे नीकुरे टाकुनि थोर शंका ।। ३३ ।।। पुढे रावणू पन्नगास्त्रास सोडी । तये चालिल्या त्या नभी सर्पकोडी ।। उभ्या वानरामाजि आकांत जाले । मुखें बोलती सर्प रे सर्प आले ॥ ३४ ॥ गरूडास्त्र तें राम सोडी भडाडां । नभी चालिली पक्षिकूळे झडाडां ।।। तिहीं तोडिली सर्प कूळे तडाडां । कपी गर्जती नामघोषे घडाडां ।। ३५ ॥ पुढे रावणे सोडिली ती अचाटें । नभी चालली थोर गंधर्वयाटें || भुमी पाय आकाशपयर्थी शिशाळें । बहू भार ते धावले येकवेळे ।। ३६ ।। निवारावया राम तो ते चि सोडी । नभामाजि ते अस्त्र अस्त्रासि तोडी ॥ रणी रावण थोर क्रोधाग्नि चाळा । रूपे जाहला थोर कैर्कोट काळा ॥ ३७॥ शरा अस्त्र ते सोडिले लंकनाथें । बहूसाल वर्षाव केला अनर्थे ।। महासिंह नानापरी सर्प जैसे । महामत्त व्याघ्रापरी बाण तैसे ।। ३८ ॥ बचाअस्त्र सोडूनि रौजीवनेरें । असंभाव्य ती चालिली वजअस्त्रे ।। तिहीं सर्व ही बाण छेदन नेले । कपी वीर ते थोर आनंदवीले ।। ३९ ।। तया रावणा कोप पोटी भडाडी । कडाडीत को रणी बाण सोडी । अकस्मात तो त्यावरी स्पर्श जाला । गडाडीत मेघापरी शब्द केला || ४० ।। रथारूढ जाला रणी लंकनाथ । पदी चालतो रामराजा समर्थे । नभी देव ते देखवेना तयांला । स्यू मौतली शीघ्र तो पाठवीला ॥ ४१ ॥ बहू शस्त्र मंडीत रत्नी विराजे । परी अंतकातुल्य तो राम साजे ।। नभी दुर्दुभी घोष आकाश गाजे । तया रावणा अंतरीं क्रोध माजे || ४२ ॥ पुढे बोलता जाहला घोर वाणी । तुला साह्य जाला रणी वजौणी ।। उभा रे रिपू खीळितो आजि बाणी । तुशी झुंजतां थोर वाटे शिरॊणी ।। ४३ ।। तुझा बंधु म्यां पाडिला एकवेळां । रणामाज त्या देखिले त्वां चि डोळां ।। तयासारिखें तूज मारीन आतां । पतंगापरी जाळितों जातजातां ॥ ४४ ॥ १८. पत्रगास्त्र-सपास्त्र. १९. शिसाळे मस्तकें.२० कर्कोट= सर्प. २१. राजीव नेत्र- कमलनयन, २२. मातली-इंदाचा सारथी. २३, अंक यम. २२. दुंदुभो नमारा. २५. जपाणी-इंद्र.२६ शिराणी आवड,