पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत अरे रावणा घे तुझी नीज कांता | जगज्जननी आणिली व्यर्थ सीता ।। तिचे ऊसने काढिती द्रमपाणी | वदे मुख्य मंदोदरी दैन्यवाणी ॥ १७ ॥ अहो प्राणनाथा असे काय केलें । तुम्हां देखतां की मला कष्टवीले || महा रम्य नेत्री महा वोघ जाती । विला करूं लागली ते रुदंती ॥ १८॥ करूणास्वरें रावणालागि बाहे । प्रभ धांव रे वानरू नेत आहे || प्रसंगी तये थोर आकांत जाला । भुमीकंप होतां चि पाहों निघाला ।। १९ ॥ पुढे अंगदा लात हाणोनि पाडी । तया जांबुवंतासि वेगें लथाडी ।। कितीएक ते ताडिले मष्टिघाते । किती वोढिले पाडिले व्योमपंथें ।। २० ॥ नभी ऊर्ध्व पाहोनि वेगी उडाला । बळे झोडिले पाडिले मारुतीला । धरी हृदयीं शीघ्र मंदोदरीला । विवेके चि संबोखिले त्या वधूला ॥ २१ ॥ अहल्या सती ते शिळारूप होती। विचारूमि पाहें नळाची दमंती ॥ बहू कष्टली मुख्य वृंदा पुलोमा । सिता सुंदरी सांगणे काय तुम्हां ।। २२ ॥ बहूतां परी ते सती तोषवीली । पती धाडितां भूवनामोजी गेली ।। दळे सिद्ध केली रथारूढ जाला । रणी शर संग्राम सैरा निघाला ॥ २३ ॥ प्रताप बळें वाहिनी घोर चाले । कपी वीर ते सर्व पूर्वीच गेले ॥ पुढे सोडिता जाहला बाणजाळें । बळे धावती प्रेरिले दत काळे ॥ २४ ।। कपीभार ऊठावले लागवेगें । करी घेतली वृक्ष पाषाण शंगें। बळे टोकित जाहले द्रमपाणी । रणी रावणे भेदिले सर्व बाणी ॥ २५ ॥ गळाले महा वीर धाके पळाले । चळी कांपती राघवा आड गेले || उभा राहिला राम तो वीर गाढा । करी घेतला चंड वोदनि मेढी ।। २६ ॥ बहू बाण सोडी महा वीर कैसा । रणी क्षोभला काळ कत्तांत जैसा ।। महा वीर ते दोघ सन्मख आले । बळे सोडिती बाण बाणी मिळाले ।। २७ ।। रणामाजि ते तोडिती बाण बाणीं । बहू मातली ते विरश्री फुराणी ॥ पुन्हा रावणे सोडिल्या बाण कोडी" । लिलाविग्रंही राम तात्काळ तोडी ॥२८॥ बहू क्षोभले व्योम संपूर्ण केले । शरी दाटलेसे नभी थाट जाले ।। बळे तोडिती एकमेकां विरांचे । पुन्हा मागुती भार येती शरांचे ॥ २९ ।। रणी झंजती ते महा वीर बाहो । मोहो पावले ते भयें केतु हो । १०. संबोखिले समजाविलें. ११. वधू-स्त्री. १२. भवनामाजि-घरांत. १३. वाहिनी फौज. ११. मेढा तिरकमठा. १५. बाणकोडी-कोट्यावधि बाण, १६. लीलाविग्रही-कोडे करितां धारण केले आहे शरीर ज्याने असा (राम). १७. सहकेतु राक्षस, व नवग्रहांत या दोघांची गणना आहे. ज्योतिष दृष्टीने पाहिले असता पृथ्वीची कक्षा व चंद्रकक्षा यांचे जे दोन संपात म्हणजे छेदनबिंदु तेन हे होत.