पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. पढें शीघ त्या रावणाच्या वधांती । समाधान ते पाविजे ते समस्ती ।। म्हणोनी त्वरें हेचि आतां करावे । बळे सर्व लोकत्रया सूख द्यावे ॥ ३ ॥ वदे रावणानूज वाक्य प्रमाणे । प्रभो कल्पवृक्षातळी काय ऊणे ।। परी होम आरंभिला राणवाने । पुरा जालिया भीडिजे त्यासि कोणे ॥ ४ ॥ कपी वीर ते पाठवावे भुपाळे । महा होमविध्वसिजे शीघ्र काळे । अरी रावण तो रणामाजि येतां । पुढे पाठवावे तया मोक्ष पंथा ।। ५ ॥ प्रभू हेर ते गुप्त लंकसि गेले | समाचार साकल्य घेऊनि आले ।। कपीद्राकडे पाहिले राघवाने । विसं जाणवीले तया सुनिवाने ॥ ६ ॥ पुढे ग्रंयसंख्या कपी सिद्ध जाले । सहस्त्रे दहा वीर मागे मिळाले । हनुमंत तारासुतं जांबुवंतू । गवायू सुषेणू बळी वीर्यवंतू ।। ७ ॥ सुंगधू कपी नीळ तो शर्भ नामे । महा मैंद तो दीविदू वीर धर्मे ।। सहस्त्रे दहाशी बळे सिद्ध झाले । महा वीर ते व्योमपंथे निघाले ॥ ८॥ किती एक राक्षेस ते रक्षणेशी । कपींनी बळे युद्ध केले तयाशी ।। मखें हांकिती हांकिती थोर नेटें । तयां पसती रे दर्शग्रीव कोटे ॥ ९॥ गहेचे मखी लाविली चंड शीळा | तये भोवते जाहले वीर गोळा ।। शिळेने शिळा फोडिली थोर घाते । कपी चालिले ते गहेचे नि पंथें ॥१०॥ पुढे मारुती चालिला लागवेगे । कपी चालिले सर्व ही मागमागे॥ महायोगियाचे परी बैसला तो नभी पावक तो भडाडीत जातो ॥ ११ ॥ तया हाणते जाहले दूर्मपाणी । मुखी हाकिती टाकिती घोर वाणी ।। शिळा शीखरें हाणती तो उठेना । कपी लोटती ध्यान त्याचे सुटेना ॥ १२ कितीएक ते गर्जती कर्णबीळी । मुखामाजि ते टाकिती एक धूळी ।। विरी वानरी मांडिलीसे धुमाळी | बहुतांपरी ताडिला होमकाळी ।। १३ ॥ बहूतांपरी मांडिले प्रेत्न नाना । परी रावण कांहि केल्या उठेना ।। विरें अंगदे थोर वीचार केला । बळे शीघ्र अंतःपुँरामानि गेला ॥ १४॥ बहूसाल अंत:पुरी त्या सुनारी । तयांमाजि मंदोदरी मुख्य नारी ॥ तियेलागि घेऊनि वेगी उडाला । महावीर तेथे अकस्मात आला ।। १५ ॥ अलंकार चीरें करें चूर्ण जाली । बहू कंकणे भूषणे भन्न केली ॥ कपी कंचुकी केश वोदूनि घेती । विटंबूनि लोटूनिया शीघ्र देती ।। १६ ।। १. ग्रंथसंख्या चोवीस हजार ( वाल्मीकि रामायणाची ग्रंथसंख्या चोवीस हजार आहे). २. तारासत=अंगद. ३ व्योमपंथे आकाश मार्गाने.. दशमोव-दहा आहेत श्रीवा (मस्तकें) ज्याला. ५. पावक-अग्नि. ६. दुमपाणि-म (वृक्ष) आहेत हातांत ज्यां- च्या ते. ७. अंतःपुर जनानखाना.८.चीरें वस्त्रे. ९. कंचुकी-चोळी.