पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत उडाला नभामाने तो लागवेगे । बळे जातसे मारुती व्योममार्गे || ९५ ॥ कपी लागवेगें बळें जात आहे | मही मंडळी तेज हेलावताहे ।। अयोध्यापुरीमाजि रामानुजाने । कपी भेदिला पाडिला एक बाणे ।। ९६ ।। मुखी रामनामावळी बोलताहे । महावीर तो त्यास येऊन पाहे ।। झणे कोण तूं सांग आम्हां कपी रे । बहूसाल तूं दीससी साक्षपारे ॥ ९७ ॥ मखी रामनामे सखा वाटतोसी । विरा कोण तं कोठपर्यंत माशी ॥ ह्मणे मारुती वोखटे थोर जालें । सुमित्रासुतालागि देहांत आले || ९८ ॥ समाचार सांगीतला मारुताने । मुखे बोलिले शीघ्र रामानुजाने ।। कपी कष्टलासी बहू दूर जातां । सुखे बाणमखावरी बैस आतां ॥ ९९ ॥ त्वरें पाठवीतो विरा शीघ्र जावे । पुढे राहिले कार्य वेगी करावे ।। ह्मणे मारुती हे कदाहि घडेना | उडाला नभी लंघितो देशनाना ।। १००॥ त्रिकुटाचळी राम तो वाट पाहे । विरवीर तो सर्व ही बैसला हे ॥ अवस्था बहू लागली आवरेना । बहू रात्र जाली कपी कां दिसेना ।। १०१॥ बहू राम तेथे उतावेळ जाला । अकस्मात तो मारुती शीघ्र आला ।। कपी सर्व आनंदले गर्जताती । प्रभूलागि सांगावया शीघ्र जाती ॥ १०२ ।। मनी चितिले शीघ्र हातासि आले । तयासारिखे ते समस्तांसि जाले । सुषेणे रस काढिला औषधींचा । क्षतामाजि तो वोतिला अमृताचा ।। १०३॥ सुमित्रासुतालागि आरोग्य जाले । समस्ती विरी मारुता गौरवीले ॥ त्वरे ऊठिला वीर सौमित्रबाहो । रघूनायके देखिला दिव्य देहो ॥ १०४ ॥ कपी राम सौमित्र मेळा मिळाला । गिरी मारुती शीघ्र ठेवून आला ।। पुन्हां मागुती भेटती एकमेकां । तया देखतां सूख जाले अनेकां ॥ १०५ ॥ कथा ऐकतां नासते कार्य होते | महा विघ्न ते भन्न होऊनि जाते ।। सुखानंद आनंद नानाविलासी | अखंडीत हे प्राचिती रामदासी ॥ १०६ ।। प्रसंग नववा. ह्मणे वीर सौमित्र स्वामी समर्था । बळे तोडिने योर चत्वारि चिंता ।। सुरेशासि ह्या मुक्त आधी करावें । अरिौतया राज्य हे शीघ्र द्यावें ॥ १ ॥ कपीरीज हा राज्य त्यागोनि आला । कपीशी पुन्हा पाहिजे शीव गेला । प्रभो नीजबंधूस त्या भेट द्यावी । अयोध्यापुरी सर्व सूखी करावी ।। २॥ ५९. रामानुज-रामाचा धाकटा भाऊ भरत. x, वेगीं करावें-सिद्धीस न्या. ६०. सुषे ण-रामाच्या वैद्याचें नांव. ६१. सुरेश इंद्र. ६२. अरिभ्राता=विभीषण. ६३. कपीराज- कुणीव. ६४. निजबंधु-आपला भाऊ भरत.