पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धुंद्रकांड. समस्ता मनी लागली थोर चिंता । कपी बोलती नासले कार्य आतां ॥ ८॥ पुढे राघवा शोक तो आवरेना । धरीता बळे धीर पोटीं धरेना ।। मिळाली दळे भोवती दैन्यवाणी | विलापे वदे राम कारुण्यवाणी ।। ८१ ॥ पुढे बोलता जाहला वैद्य तेथें । प्रभु शोक केल्या पुढे काय होते ॥ म्हणे औषधी शीघ्र अतां आणाव्या । न जातां निशी सर्व देहीं पिळाव्या ॥ ८२ ॥ बह साल तो पंय दूरस्त आहे | करा वेग हा काळ जातो न राहे ॥ समस्तांकडे पाहिले राघवाने । कपी बोलते जहाले सर्व माने ।। ८३ ॥ बळासारिखी बोलिली सर्व सेना ! निशीमाजि तो आचळ आणवेना ।। रघुनायके पाहिले मारुतीला । कपीराज तो शीच ऊदीत जाला ॥८॥ म्हणे राम गा मारुता ये प्रसंगी । विरांसारखी शक्ति तूं बोल वेगी। वदे मारुती स्वामि देवाधिदेवा । गिरी आणितो शीघ्र सांगाल तेव्हां ।। ८५ ॥ तये बोलतां राघवा सूख जाले । प्रतीउत्तरी कपीते गौरवीले म्हणे मारुती जाय गा हे प्रसंगी । गिरी आणिला पाहिजे रात्रभागीं ॥८६॥ म्हणोनी तुवां शीघ्र आतांचि जावे । विरा लक्ष्मणालागि त्वां ऊठवावें ॥ कपी मारुती वीर तैसा उडाला । अकस्मात तो आश्रमामाजि गेला ।। ८७ ॥ स्थळे निर्मिली रम्य नानापरीची | बहसाल ती भूवने कँसरीची ।। मनी बोलती हो दयाळा बसावें । फळे तोय सेऊनि सखे रहावे ॥८॥ म्हणे मारुती राहतां पूरवेना | तृषा लागली धार पोटी धरेना ॥ मनीने तडागा जळा दाखवीलें । जळा सेवितां थोर आश्चर्य जालें ॥ ८९ ॥ जळांतनि धांविन्नली जी विशाळा । विरें मारते देखिलें तीस डोळा ।। मिठी घातली मारुते चूर्ण केली | तिच्या मेदेमांसे भुमी तृप्त जाली ।। ८०॥ निघाली तियेतनि ते दिव्य कांता । निरूपी मुखे सर्व साकल्य वार्ता ।। ह्मणे राक्षस बैसला कूडभावे । समर्था प्रभो त्यासि आधी वधावे ।। ९१ ॥ नव्हे मिथ्य साचार हे सांगते मी । प्रभो धाडिला रावणे काळनेमी ।। तये बोलतां मारुती डि जाला । ऋषी ऊठला शीव युद्धासि आला ॥ ९२॥ महावीर राक्षस कैसा कुकर्मी । बहूसाल ते जाहले काळनेमी ।। प्रसंगी तये. थोर संग्राम जाला । कपीच्या करे काळनेमी निमाला ॥ ९३ ॥ विरें सुंदरीलागि उद्धार केला । उडाला बळे तो नभामाजि गेला || गिरीचंद्र टाकूनियां लागवेगीं। कपी वीर द्रोणाचळी ते प्रसंगी ॥ ९४ ॥ वटा वेढिता जाहला शेष जैसा | गिरी बांधुनी छेदिला शीघ तैसा ।। ५५. कसरी कौशल्य. w. दयळा-हो पुढे शीत यावे. ५६. मेद चरबी. ५७. कूडभाव-कपटभाव. ५८. वाड मोठा. .