पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासस्वामींचे चरित्र. शेलापागोटें देवविले. त्याच वर्षी माघ शु० १ स वासुदेव गोसावी यांची स्या- पना कण्हेर गांवच्या मठी केली होती. शा० श. १५८१ त मार्गशीर्ष शु० ५ स अबदुल्लाखान विजापूरचा सरदार यास मारिल्यानंतर शिवाजीमहाराज स्वामींचे भेटीस गेले तेव्हां त्यांजकडे पाहून दासबोधांतील उत्तमपुरुषलक्षण वर्णनाचा समास स्वामींनी समाप्त केला व शिवाजीमहाराजांस परमार्थाच्या चार गोष्टी सांगितल्या. त्याच साली माघमासों वद्य ५ स वेडयांचे मिष करून स्वामींनी सर्व शिण्यांची परीक्षा पाहिली तीत एकटा कल्याण मात्र कसोटीस उतरला. शा० श. १९८२ त शिवाजीमहाराज काही कामानिमित्त राक्षसभुवनास गेले होते तेव्हा तेथून समांचे बंधु श्रेष्ठ ऊर्फ रामारामदास हे २० कोसांवर जांबेस आहेत असे समजन त्यांचे दर्शन घेऊन महाराज परत साताऱ्यास आले. पढ़ें भागानगरी केशव स्वामींस भेटून परत येत असतां वाटेंत कल्लयाणी येथे शिव- राम गोसावी यांची भेट समर्थांनी शाश०१५८३ त घेतली व त्यांनी के लेल्या बालबोधपंचीकरण नामक ग्रंथाचे शेवटी आपल्या पांच ओव्या शिवराम स्वामींचे आग्रहावरून घातल्या. त्याच साली प्राकृत ग्रंवद्वारे धर्माचा सुगम उपाय सर्वांस सांगत नावे असा बोध वासुदेव गोसाव्यांस समर्थांनी केला. शा. श० १५८१ त समर्थानी गारुड्याचा खेळ करवून त्या मिषाने शिष्यांस ब्रह्म- ज्ञान सांगितले. शा० श०.१५८५ त समर्थां! जेजूरीचे खंडोबाचे दर्शन चिंचवडाहून परत येत असतां घेतले.भाशा० श० १५८६ त रंगनाथ स्वामी- चे वडील निजानंद स्वामी यांचे पुण्यतिथीस क-हाडास जाऊन नंतर निगडीस काही दिवस राहून समर्थ पौष व० १३ स चांफळास परत आले. शा० श० १५८८ त समयानी जयराम स्वामी वडगांवकर यांस असा बोध केला की, साधूंनी मृत प्राणी उठविण्याचा आव कधीही घालू नये. त्याच वर्षों समर्थांनी शिवा- जी महाराजांची भक्ति आपणावर कितपत आहे हैं एक युक्ति योजून पाहिले. शके १५८९ त आनंदमूर्तीची भेट समर्थांनी ब्रह्मनाळी घेतली. शा० श० .२५८३ त शिवाजीमहाराज चांफळ संस्थाच्या खर्चाची व्यवस्था चांगली कर- वून मग कर्नाटकांत स्वारीस गेले. समर्थांचा एक आवडता बोका होता त्याचे नांव त्यांनी रामा असे ठेविले होते. शा० श० १५९६ त आनंदनाम सं. वत्सरी ज्येष्ठ शु० ९ मंदवारी समथांचे आज्ञेवरून शिवाजीमहाराजांस राज्या. भिषेक झाला. त्याच वर्षी कपिला षष्ठीचे पर्व आले ते समयी समर्थ माहुलीस कृष्णास्नानास गेले. शा० श. १५९८ त फाल्गुनवद्यपक्षी जांबस श्रे- ठांस भेटण्याकरितां समर्य गेले. नंतर शेवली येथील देशमुख यांचे घरून ११. शा. स. १५८१. ' याचा भक्तिरहस्य म्हणून एक ग्रंथ आहे. * निजाम हैदराबाद.