पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६ ) श्रीरामदासकृत महावीर ते थोर धाके गळाले । विमानाहुनी देव नेटे पळाले ॥ ६५ ॥ सुमित्रासुता लक्षिले रावणाने । त्वरे टाकिली शक्ति माहाविराने ॥ बळे आदळे ते अकस्मात अंगी। रणी वीर सौमित्र तो प्राण त्यागी ।। ६६ ॥ दळी वानरांचे हाहाकार जाला । महावीर सौमित्र युद्धी निमाला || कपी वीर नैऋत्य धांवोनी आले । तया भोवती वीर सर्वे मिळाले ।। ६७ ।। पुढे शोक आरंभिला राघवाने । तया वारिले शीघ बीभीषणाने । म्हणे काय जी स्वामिया कोण वेळा । उभा रावण तो पिटावा नृपाळा ।। ६८॥ सुमित्रासुता मारिले तो उभासे । कपीवाहिनी थोर आकांत भासे || प्रभो शोक सांडून वेगें उठाचे । धनुर्वाण घेऊनियां सिद्ध व्हावे ।। ६९ ॥ रणी रावणे भेदिल ब्रम्हचौरी । मिळाले कपी देखिल्या दैत्यहारी ।। बळे हाक देऊनि क्रोधे नरेंद्रे । सिमा सांडली रामकाळाग्निरुद्रे v ॥ ७० ॥ करी बाण कोदं. चंड प्रतापी । रणी रावणा भासला काळरूपी ।। पुढे देखतां पातली कंपवेळा । उभा राम ग्रासील नेणों भुगोळा ।। ७१ ॥ चळे सूटला रावणा कंप देहीं । भये भूलला न स्मरे युद्ध काही ।। पड़े चांचरे धांवतां थोर धाके । पुढे पाहतां राम सर्वत्र देखे ।। ७२ ।। रणी पाडिली दैत्य कूळे अपारे । तया रावणा लागले घायबारे ।। बळे झोडितां थोर नेटें पळाला । चळी कांपतो गर्व ताठा गळाला ।। ७३ ।। रणी भ्रष्ट ला तो भयातूर जाला । पुढे रावणू मंदिरामाजि गेला ।। समाचार मंदोदरीलार्ग बोले । म्हणे आजि युद्धी बहु कष्ट जाले ॥ ७४ ।।. समाचार तो सर्व ही सांगताहे । म्हणे काय होणार ते होत आहे ॥ बहुतांपरी तूं मला शीकवीलें । परी मूर्ख मी सर्व ही तुच्छ केले ॥ ७५ ।। करूं काय आतां प्रिये सांग वेगीं । बहू बोलता जाहला ते प्रसंगी ।। त्वरे काळनेमी पुढे पाठवीला | स्वये शीघ्र ऊठोनि होमास गेला || ७६ ।। पुढे चालिला वीर तो काळनेमी । बहसाल तो थोर कापटय कमी ।। हनुमंत जाईल द्रोणागिरीला । पथामाजि तो बैसला योग केला ।। ७७ ॥ बने कर्दळी पोफळी नारिकळी । बनें आंवळी जांबळी रम्य वोळी ।। बहू वृक्षजाती बहू पुष्पजाती । बहू कूप बावी तळी ओघ जातो ॥ ७८ ।। बनें पावनें जीवने भूवनें तीं । सुखे गोमुखे रम्य वृंदावने ती ।। ति, सुंदरे बांधले सारवोटे । अकस्मात ते देखतां सौख्य चाटे ।। ७९ ॥ रणी पाडिला वीर सौमित्र जेथे । मिळाले कपी ऋक्ष ते सर्व तेथें ।। ५१. नैऋत्य-राक्षस. ५२. ब्रलचारी-चवदा वर्षेपर्यंत ब्रह्मचर्यव्रत धारण केलेला ल- क्ष्मण. . राम-कर. ५३. कोदंड-धनुष्य.