पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. पढे रावण थोर को कडाडी । करी गर्जना मेघ जैसा गडाडी ।। बहू कोपला तो असू रास्त्र सोडी । तेणें चालिल्या त्या नभी चक्रकोडी ।। ५१ ॥ असंभाव्य ती चालली घार चक्रे । महातेज पुंजाळ त्यांची वगरें । कपी वाहिनीमाज ते एकवेळे । तुटो लागली वानरांची शिसाळे ।। ५२ ॥ पुढे देव गंधर्व अस्त्रास सोडी । तेणे तोडिल्या सर्व ही चक्रकोडी ।। रणी रावण रुद्रअस्त्रास घाली । शुळामसळांची नभी दाटी जाली ॥ ५३ ।। धधाटे कपांच्या दळामाजि यावे | तयीं योजिले ते महाअस्त्र देवें ॥ महाथोर माहेश्वरी मळ मंत्रे । तये सोडिले सूटली ववशस्त्रे ॥ ५४॥ लोहोमसळे ते गदा शूळ हो ते । बळे तोडिले पाडिले बजघाते ।। दशग्रीव तो क्षोभला काळ जैसा । तये भेदिले पंच बाणी सुरेशा ॥ ५५॥ रिपबाण सर्वांग भेदून गेले । दळी रावणाच्या महा घोष जाले ।। वप भदिलो रावणे पंच बाणी । चळेना रणी राम तो वजठाणी ॥ ५६॥ रणी ऊसणे घेतले राघवाने । दशग्रीव तो भेदिला सप्त बाणे ।। महा दुःख जाले तया रावणाला | सुमित्रासुता थोर आवेश आला ॥ १७ ॥ तया आग्रजालागि घालुनि मागें । महावीर तो चालिला लागवेगें ॥ सुमित्रासुते बाणघाते निघातें । रिपूसारथी धाडिला मृत्यूपंथे ।। ५८ ॥ पढे मागुते थोर संधान केलें । रिपूच्या धनलागे छेदून नेले ।। तया वीर बीभीषणा कोप गाढा । रणी चालिला चंड वाहून मेढा ॥ ५९॥ तयें पाडिले अष्ट तूरंगमाते । ध्वजस्तंभ तो छेदिला बाणघाते ।। रथ सारथी सर्व ही भन्न केला । दशग्रीव दूजे रयीं स्वार जाला ॥६॥ महाशक्ति ब्राम्ही तया रावणानें । अनावरी टाकिली ते फुराणे ॥ कडाडीत धांवे महावीज जैशी । करी शेष मागे रिबांधवासी ।। ६१॥ सुमित्रासते घोर संधान केलें । महाशक्तिते शीघ्र छेदन नेलें ॥ शरे ताडितां पावका वष्टि झाली । कितीयेक राक्षेससेना निमाली || ६२॥ रणी रावण तो कडाडीत कोपे । सिमा सांडिली घोर रूपे प्रतापें ।। धुधुःकार सांडीत घर्डीत दाढा । अनासि ऊठावला वीर गादा ।। ६३ ॥ महाशक्ति काढूनि मायासुराची । बहू काळ संन्नीध तैशी विरांची || तये लाागं त्या रावणे सिद्ध केले । जयेमाजि ब्रम्हांड बिंबोन गेलें ॥ ६४ ॥ कडाडीत घोषं धडाडीत ज्वाळा | तडाडी नभामाजि नक्षत्रमाळा ।। १५. वगरें तोंडें. ४६. माहेश्वरी रुद्रास्त्र. १७. अनुज रावणाचा धाकटा भाऊ विभीषण.१८.शेष शेषाचा अवतार लक्ष्मण. १९. रिपुबांधव-शचा भाऊ बिभीषण. ५१. सायासुर-मयासुर.