पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६२) श्रीरामदासकृत. कपीनाथ सुग्रीव देखोनि ऊणें । बह कोपला वीर तो कोटिगणे ।। बळे लांगुळे घाव हाणे महीला । गदे झेलिले t तोडिले त्या रयाला ।। ३९ ॥ निमाले गदा लागतां दिव्य घोडे । रथू वीघडे चर्ण होऊनि मोडे ।। पडे सारथी दैन्यवाणा उताणा | विरा राक्षसा मूर्छना सांवरेना ॥ ४० ॥ रणी उठला वीर तो सिद्ध जाला । गदा घेतली हांकिले सुनिवाला ।। बळे हाणतां झेलिली त्या कपीने । पुन्हा हाणती येकमेका गदेने ।। ४१ ।। बळाचे महावीर दोघे प्रतापी । गदा हाणती भीडती काळरूपी ॥ गदाघात संघट्टणे वन्हिवृष्टि । नळोप लागली पावके सर्वसृष्टि ॥ ४२ ॥ तया देखतां मंत धावोनि आला । रणामंडळी हांकिले अंगदाला ।। बहू त्रासिता जाहला घोर वाणी । तये अंगदा भेदिले पंच बाणी ॥ ४३ ॥ तया मूर्छना देखतां जांबुवंतें | महावीर तो ताडिला वृक्षघाते ।। विरे राक्षसें वृक्ष छेदनि नेला | रणी भेदिला ऋक्ष तो भग्न केला ॥ ४४ ॥ रणी भेदिले देखिले त्या रिसाला । गवाक्षा विरा योर आवेश आला ॥ पुढे लक्षिता जाहला राक्षसाते । बळें ताडिले थोर पाषाणघातें ॥ ४५ ॥ विर शीघ्र पाषाण तो भग्न केला । शरे नौकरें भेदिले त्या कपीला ।। गवाल कपी तो भुमी आंग घाली । तयीं अंगदें मूर्छना सांवरिली ॥ ४६ ।। करी सार आसीलतेशी निघाला | बळे हाक देऊनि सन्मूख आला ॥ कठोरें करें ताडिले राक्षसाते । महामंतु तो चालिला मृत्युपंथें ।। १७ ।। रणामंडळी शांति जाली रिपूंची । दळे गर्जती जाहली वानरांची ।। उणे दोखितां रावणा कोप आला । प्रताप रणामाजि युद्धा निघाला ॥ ४८ ।। रयू लोटिला रावणे शीघ्र काळे । बहूसाल ती सोडिली बाणजाळे ।। पुढे देखतां राम तात्काळ छेदी । पुन्हां रावणू घोर संधान साधी ।। ४९ ॥ नभी सोडिले बाण कोटयानुकोटी । असंभाव्य जाली बहु थोर दाटी ॥ महामेघ तो मोकैली मेघधारा । रघूनायके छेदिले ते सरारां ।। ५०।। ११. लांगूल शेपूट. t. गदें झेलिले तोडिले त्या रथाला गदा मोडिली पाडिलें त्या रथाला.१२. सारथी-रथहांकणारा. u. जळों लागली पावकें सर्व सृष्ठि-तया पावकें जाळिली सर्व सष्ठि. लोक २२ व १३ यांच्या दरम्यान हे दोन श्लोक एका पोथींत अधिक आहेत:- बळे हाणतां मंगले सर्व कांहीं । गदा टाकिल्या घेतले शळ तेही । रणों भीडतां शळ ते चूर्ण झाले । महावीर ते मल्ल युद्धासि आले ।। १ ।। दणाणा रणामाजि ते मुष्ठिघाते । बळे हाणिती एकमेकां निघाते ।। कपी सुप्रिवें दीधली बजमुष्टि । महा वीर तो पाडिला प्रेत सष्टि ।। २ ।। १३. ऋक्ष आस्वल (जांबधान). 28. मोकली सोडी.