पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. बहूतांपरीची बहूसाल शस्त्रे । बहू हाक देती विशाळें वैगों ।। कपीनायका भोवती दाट थाटे । रणी धांवती वीर ते कड़कडाटें ॥ २४ ॥ पुढें रावणे देखिला, थोर थावा । असंभाव्य तो सुत्रिवाचा उठावा ॥ कपीचक ते घोर अद्भत आले । मनामाजि ते चार आश्चर्य केलें ॥ २५ ॥ कपीचा रणी लोळ कल्लोळ आला । गजारूढ माहामतू सिद्ध जाला ।। तया रावणा देखता युद्ध होते । बहू मांडला आट त्या राक्षसांते ।। २६ ॥ गजारूढ महामतू शैल जैसा । शिळा टाकितो वीर सुग्रीव तैसा ॥ गजामस्तकी ते शिळा चंड आली । गरारून तो कुंजरू आंग घाली ॥२७॥ गजा पाडितां छेदिला उष्ट्र दंती । बळे चालिला शूळ घेऊनि हस्ती ।। ह्मणे साहरे साह तूं सनिवाला । सुळा टाकितां वीर वर्ता उडाला ॥ २८ ॥ पुढे सूळ मोडूनियां लागवेगें । गदा घात हाणे तया पृष्टिभागे || महा वीर तो घोर मारे पळाला । रणी राक्षसां थोर संहार जाला ॥ २९ ॥ विरवीर राक्षस ते भग्न केले | कपी धीट ते नीट मारीत आले ॥ तयां देखता वीरुपाक्ष निघाला । बहूसाल धिःकारिले सुग्रिवाला || ३० ।। पुढे सुनि बाड मुंबाड हाते । रिपूचे रथी टाकिले घोर घाते | चरी पाहतां झाड सन्मूख आलें । विरें बाण टाकूनि छेदून नेलें ॥ ३१ ।। शिळा टाकिली चंड त्या सुनिवाने । बळे फोडिली बाण घातें विराने ।। पुन्हां राक्षसे घोर संधान केले । कपो सनिवे तुच्छ मानूनि नेले ।। ३२ ॥ पुढे सुग्नि शंग त्या आचळाचे । करी घेतले अग्र मंद्राचळाचे || बळे टाकिली ते शिळा घोर घातें | विरूपाक्ष तो चालिला मृत्युपंथें ॥ ३३ ॥ रणी राक्षसां पातली मृत्युवेळा । पुढे देखिले रावणे त्यांसि डोळां ।। अहारे कसे काय जाले कपाळा । भयें भलला पातली कंपवेळा ॥ ३४ ॥ पुढे रावणे देखिले सव्यं भागों । महा वीर विद्युन्मतू ते प्रसंगी। तया बोलला पाहसी काय वीरा | महावीर तो पेटला घोर मारा ॥ ३५ ॥ । रथारूढ होऊनियां सुनिवाला । पुढे शीघ्र पाचारिले त्या कपीला ।। शरांची शते टाकिली राक्षसाने । विरश्रीबळे साहिले सुग्रिवाने ॥ ३६ ॥ पुढे सुनिवे घेतली चंड शीळा । बळें टाकिली त्यासि लसूनि डोळां ॥ शिळा फोडिली राक्षसे बाणघातें । बहू कोप आला तया सुग्रिवाते ॥ ३७॥ शिळा घेतली दुसरी सुग्रिवाने । पुन्हा टाकिली चंड महा विराने ।। तये राक्षसे फोडिले त्या शिळेला । महावीर तो धीर देतो दळाला ॥ ३८ ॥ ३९. वग-तोंडानें.. पळाला-निमाला.१०. सन्य-डावा (लोकांत सभ्य याचा अर्थ उजवा समजतात. परंतु तो अर्थ खरा नव्हे.)