पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत भयें बोलती सांगती रावणाला । रणामाजि तो सर्व संहार जाला ॥ असंभाव्य तो कोपला पापराशी | पुढे धाडिले शीघ्र तीघांजणासी ॥ १२ ॥ विरूपाक्ष विद्युन्मतू आणि मन्तू । रथारूढ होऊनियां लंकनाथू ।। महाशस्त्र सामुनिया तो समर्थं । बळे चालिला रुंधिला राजपंथू ।। १३ ।। असंभाव्य सेना पुढे आणि मागे । रणामंडळा चालिला लागवेगे । बहूसाल वाये पुढे येक वेळां । समारंगणी नाद गेला भुगोळा ।। १४ ॥ स्थां घोडियां कुंजरां दाटि जाली । उफाळे बळे चंड सेना निघाली || बहू शस्त्रपाणी बहू छत्रछाया । बळें वोळले मेघ जैसे पडाया ॥ १५ ॥ उभा राहिला रावण राजभारें । तिघे वीर ते भिडती घोर मारें ।।। पुढे देखितां रावण सांवरेना । उभा रहातां धीर पोटी धरेना ।। १६ ॥ बळे वाईली रावणे चंड चापे । बहसाल ते बाण सोडी प्रतापें ।।। असंभाव्य ती सोडिली बाळजाळे । तुटो लागली पादपाणी शिसाळे ।। १७ ॥ कपी सर्व ही छेदिले मुख्य शत्रु । रणामंडळी गर्जला तो अमित्र ।।। कपी खोंचले नेट पोटी घरेना । परोधिक्य ते मुग्रिवा साहवेना ।। १८ ॥ वळे हाक देऊन तैसा निघाला । तया पाठिशी तो विर"वीर आला || किती येक ते बाड जुबाड हाती । किती येक ते धांवती शंग घेती ॥ १५॥ किती येक घेऊनियां चंड शीळा । किती येक फिराविती भिंडमाळा ।। कितीएक ते झाडिती शस्त्रधारा । कितीएक घेऊनि आले कठौरा ॥ २० ॥ कितीएक ते दंड घेऊनि आले | कितीएक ते शेळेपाणी मिळाले ।। कितीयेक लोहर्गळी ते प्रसंगी । कितीकी गदा घेतल्या लागवेगी ।। २१ ।। कितीयेक घेऊनि आले दशनी" । कितीयेक घेऊनि आले शैतन्त्री ।। किती तोमरें पंडिशेशी निघाले । कितीयेक शळ घेऊनि आले ॥ २२ ॥ किती फैर्शपाणी किती चक्रपाणी | किती येक ते वीर खट्रोंगपाणी ।। कितीएक आँसीलता झाडिताती । कट्यारा सुन्या वीर घेऊनि येती ॥ २३ ॥ r. पाप-गर्व. २१. वाइली घेतली. २२. पादपाणो शिसाळे-हात, पाय, डोकी. २३. अमित्र-शत्रु. २१. पराधिक्य शत्रूचे वर्चस्व. २५. विरेंविर योध्यानयोद्धा. २६. शुग= डोंगराचे शिखर. २७. कुठार-कु-हाड. २८. खड़-तरवार. २९. शळपाणी:त्रिशुळ आहे. हाती ज्यांच्या असे. ३०. लोहगळा-लोखडाच्या कांबो, अडसर. २१. दशघ्नीबदुका. ३२. शतनी तोफा. २३. तोमर-शस्त्रविशेष. ३४. पट्टोश-शस्त्रविशेष. (पट्टा ). ३५, फर्शपाणी फरशी म्ह० कु-हाड घेतली आहे हाती ज्यांनों. ३६. चक्रपाणी चक्र आहे हाती ज्यांच्या ते. ३०. खटांग पाणी-बाजेचा खूर आहे हाती ज्यांच्या असे. ३८. अमिलता तरवार,