पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत म्हणे सासुन्यालागि सुलोचना ते । घडीने घडी आमुची वेळ जाते ।। समर्था मला शोर आणून द्यावें । पुढे काय मानेल तैसे करावे ।। ८७ ॥... शिरे आणितो आजि आठां जणांची । मुखें तात्र क्रोधीनळे रावणाची ।। रिपू दोघे बीभीषणा अंगदाचे । रिसा सुग्रिवा मारुता ऋषभाचे ॥ ८८ ।। बहूसाल तो कोप रायासि आला | पुढे मंदिरामाजि नेले सुनेला || तियेलागि मंदोदरी नीति सांगे । रघुनायका भेट वो लागवेगे ॥ ८९॥ अहो देखिले स्पप्न म्यां घोरवाणे । निमाले रणी सर्व राक्षेस प्राणे || नव्हे स्वप्न हे वाटते सत्य आहे | दिले राज्य बीभीषणालाार्ग पाहे ॥ ९० ॥ गृह सूटले तूटले पाशबेडी । पुढें सोडिले देव तेतीस कोडी ॥ त्रिलोकी उभी राहिली राम गूढी । पुढे साच होईल ऐशीच प्रौढी ।। ९१ ॥ म्हणोनि तुवां शीघ्र आतां उठावें | दिनाचे परी रामचंद्रा बदावें ।। करूणास्वरें राघवा आळवावें । बहूतां परी शीर. मागनि घ्यावे ॥ ९२ ॥ त्वरें ऐकतां ऊठली शब्द नेटें । पुढे वॉनिती भौट वेताळ थाटे ।। कपी वाहिनीने महद्भूत केले । त्वरें बोलती जानकी पाठवीलें ।। ९३ ॥ म्हणे राम हे सर्वथा ही घडेना । रिप मारिल्यावीण दृष्टी पडेना ।। असंभाव्य सेनासभा दाटली ते । पुढे शीघ्र सलोचना भेटली ते ।। ९४ ॥ पुढे देखतां राम सूखें निवाली | कृपा भाकितां ते नमस्कार घाली ॥ कृपासागराची बहू स्तूति केली । सुशब्दे रघुनायके तोषविली ।। ९५ ॥ प्रसंगी तये थोर आश्चर्य जाले । निचेष्टीत शीरें बरें हास्य केले ॥ कृ पाहिले रामचंद्रे दयाळे । पती ऊठवितो तुझा शीघ्र काळे ।। ९६ ॥ . खुणा दाविती वो वळावे दयाळा | सभे घालिती येकमेकांसि डोळा || कपी वीर ते सांगती कानगोष्टी । पुढे ऊठतां सर्व आटील सष्टि ।। ९७ ॥ वदे ने स्वामी बरसे विचारा। रिपू नठवावा कदा ऊपकारा ।। बदे मारुती राघवालागि रागे। रघूनायक सांडिली गोष्टि मागे ।। ९८ ।। उदासीन देखोनि सूलोचना ते । नमस्कार केला त्वरें चालिलीते ।। प्रभू सव्य घालनिया शीघ्र गेली । मनोभावना सर्व ही सिद्ध केली ।। ९९ ॥ समुद्रातिरी भीमकुंडा प्रचंडा । बळें चेतल्या वन्हिशीखा उदंडा ।। दशग्रीव मंदोदरी राजभारें । सवें चालिली गांव लोके अपारे ।। १०० ॥ ऋषी देव गंधर्व मांदी मिळाली । समस्ती तियेची बहू स्तुति केली ।। ५. क्रोधानळ कोष हाच अग्नि. ६. लागवेग-लवकर. ७. कोडी कोटी. ८. गूढी- ध्वज, झेंडा. १. वानिती वर्णिती. १०. भाट वेताळ स्तुतिपाठक. ११. था-समुदाय. १२. वाहिनी-फौज. १३. ऋक्ष-रीस जांबवान. 12. मांदी-समूह.