पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत. पुढे देखिला कोपला वीर गाढा । सुमित्रासुते वोढिला चंद्र मेढा ॥ ५९ ॥ रणी रावणी लक्षिला ते चि काळी | बळे भेदिल्या बाणभाळी कपाळी ।। नवां बाणघातें रिपू mवस्थ केला । तया मेवनादा बहू खेद जाला ।। ६० ॥ कपाळी बळे भेदिले बाण वीरें । प्रवाहो बळे चालिला तो धीरे ।। महामस्तकामाजि सर्व बडाले । कपाळावरी पिच्छ बाशिंग जालें ।। ६१ ।। म्हणे वीर बीभीषणू वीरछात्रा | बरे ऊसणे घेतले गा समित्रा ।। रिपू रावणी तापला वीर कैसा । शळे टोचितां ऊठला सर्प जैसा ।। ६२ ।। महावीर निर्वाणिचे बाण सोडी । रुघ लाघवें शेष तात्काळ तोडी ॥ असंभाव्य कोपानळे तीव्र ज्वाळा । मुखे सांडितां काळकांपें चळाळां ।। ६३ ।। सिमा सांडिली थोर कल्पांत काळीं । महावीर ते खाळिले बाणजाळी ।। बह खोंचले देह दोघांजणांचे । झरे लागले वाहती शोणिताचे ॥६४ || विरश्रीबळें दान नाहीं प्रतापे । रणी भेदिती एकमेकांस को ।। बहू माजलें युद्ध ते ओसरेना । बळें भीडती येकमेकां सरेना || ६५ ॥ पुढे काय केले सुमित्रासुताने । गुणों सज्जिले त्या रवीचक्रबाणे ।। मुखी धांवती त्या शिखा पावकाच्या । बहू चंचका कोटि विद्युल्लतेच्या ।। ६६ ॥ कडाडीत कोपानळे बाणभाळी । वळे सोडितां शीघ्र तैशी निघाली ।। भयातर दोही दळी कंप जाले। ऋषी, देव, गंधर्व धार्के पळाले || ६७ ।। ग्रहादीक आकाशपंथी जळाले । बहू खेचरे भार भूमी गळाले ।। ध्वनी ऊठला घोर घोषे तडाखा । बळी कांपती ईतरां कोण लेखों ।। ६८ ॥ सुमित्रासुते शीघ्र संधान केले । रणी रावणी शीर छेदन नेले ।। समस्तां सुरालागि आनंदवीलें । सुरेशीमनींचे महा शल्य गेले ॥ ६९ ॥ रणामानि तो इंद्रजीतू निमाला । समस्तां सुरांलागि आनंद जाला || महाकंटक घोर संहार केला । त्रिलोकी बहू कीर्तिचा घोष गेला ।। ७० ।। पुढे शेष सुगंध बीभीषणाने । दळे सर्व ही सिद्ध केली विराने ।। कपीशी सुवेळाचळा राम जेथे । महावीर ते चालिले सर्व तेथे ।। ७१ ॥ प्रभू राम तो बंधुची वाट पाहे । उतावीळ पोटी वियोगा न साहे ।। बहूसाल चिंता करी बांधवाची । म्हणे कोण वेळा सुमित्रासुताची ।। तया बोलतां भार तैसे उदेले । दळेशी बळे येश घेऊनि आले ।। समर्था प्रभूला नमस्कार केले । रघुनायका भेटले स्वस्य जाले ।। ७३ ।। 1. सोडिला चंदमेढा वाहिला चंडमेढा. m. 'सस्त' पा. ८३. रुधिर-रक्त. ८४, पिच्छ =बाणाचा पिसारा. ८५. छात्र-शिष्य. ८६. निर्वाण निकर. ८७. शोणितरगत. ८८. शिखा-ज्वाला. ८९. लेखा-हिशेब. ०.सेरश इंद्र.