पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. (५५) पुढे घोर रुद्रास्त्र त्या रावणीनें । बळें सोडिले शीघ्र माहाविराने ।। रणामाजि ते चालिले एकवेळे । भूमी पाय आकाश पंथी हिंसीळ ।। १५ ।। बळे धाविले ते रणामाजि कैसे । गिळाया भुगोळा महाविघ्न जैसे ।। तया देखतां कंप माहाविरांसी । भये मर्छना पावली वानरांसी ॥ ४६ ॥ तया देखता तो फणी सिद्ध जाला । पुढे सोडिले शीघ्र माहेश्वराला ।। उठे मातला काळ कल्पांत काळी | दिशा दाटल्या सर्व आकाश ज्वाळी ।। ४७ ॥ रखी कोटि विद्युल्लता एक वेळां । रणी धांवती कंप जाला भुगोळा ।। महातेज हेलावले ते चि काळीं । असंभाव्य तें चालिले ब्रह्मगोळी ।। ४८ ।। तया देखतां अस्त्र मागे पळाले । बहु कुळ ते खेचरांचे जळाले ॥ पुढे देखतां रावणी भ्रांत जाला । भये भूलला वारवेना तयाला ।। ४९ ॥ मनी भावितो कोण राखेल गेलों । कळेना मला व्यर्थ येथे जळालो ।। तयीं शीघ्र रामानुजे काय केले । प्रतिज्ञापणाला मनी आठवीले ।। ५० ॥ म्हणे हो मनी शीर छेदूनि न्यावें । म्हणोनी बळे अस्त्र मागे वळावे ॥ रणामंडळामाजि वीरें सुमित्रे । बळें वारिले अस्त्र ते बीजमंत्र ॥ ५९॥ म्हणे मेघनादू मला विघ्न आलें । परी थोर आश्चर्य का वाचवीलें ॥ भला वीर सौमित्र हा वीर्यवंतू । मना सारिखें युद्ध मोठे करीतू ॥ ५२ ।। असेना पुढे वीर होणार नाहीं । बहू देखिले पाहिले झुंजतां ही ।। महावीर हे सूर्यवंशी बळाचे । रिपूलागि रक्षावया कोण कैचे ॥ ५३॥ महावीर दोघे रणों ते चि काळे । पुन्हा सोटिते जाहले बाणजाळे । रणामाजि ते भेदिती एकमेकां । नभी सोडिल्या बाणभाळी अनका ॥ ५४॥ रिपूची रिपू तोडिती बाणजाळे । पुन्हा मागुती सोडिती ते उफाळें ।। विरें वीर तो भेदितां ही ढळेना । विरश्रीबळे काय होते कळेना ॥ ५५ ॥ पुढे काय केले तया मेघनाद । रणी हाक देऊनि धांवोनि कोधे ।। महातेज पुंजाळ त्या शोघ काळीं । बळे भेदिल्या तीन भाळी कपाळी ॥ २६ ॥ महावीर तो रावणी काळरूपी । पुराणा बहू काळ कापट्य रूपी ।। समित्रासुतू तो दिसे वाळलीला । बळे भेदिला रक्त वाहे कपाळा ।। ५७ ।। तया देखतां कोप नैऋत्यनाथा । पढे चालिला पाववायासि बेयों ।। रणी हाक देऊनि बीभीषणाने । गदा घेतली चालिला थोर त्रोणे ।। ५८ ॥ तया देखतां त्या दशग्रीवसूते । रणी विधिला पाडिला बाणघाते ।। ७८. शिसाळे मस्तक. १. माहेश्वर-रुद्रास्त्र... भाळी-समह. ८१ वेथा व्यथा, दुःख. २. त्राण-नेट.