पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीरामदासकृत सुमित्रासते देखिले अग्निअस्त्रा। पुढे सोडिता जाहला मेघअस्त्रा ।। तया सोडितां मेघ तैसे उदेले । गिरीचे परी अंबरी भार आले || ३१ ।। नभी दीसती ते हंडे कोट झाडें । महा मेघ गर्जोनि गंभीर वाडें ।। नभा व्यापिलें घोर अंधार जाला । दिसेना रणामाजि दोहीं दळांला || ३२ ।। नभी चालिले ते बहू कीट काळे । झकाकीत सौदामिनीचेनि मेळे ॥ बळे मेघधारा असंभाव्य गारा | सुटे कंपु सूसाट घोषे थरारां ।। ३३ ।। प्रसंगी तये पाणजंजाळ जालें । रणामंडळी तोय अद्भत आले ॥ कितीएक झाडें भुमी चूर्ण होती । पुरे पट्टणे सर्व वाहन जाती ॥ ३४ ॥ सुमित्रासुते थोर अद्भत केलें । ननाला गमे आजि कल्पांत आले ।। बुडो लागले भार त्या राक्षसांचे । बहूसाल त्या धीर गेले विरांचे ।। ३५ ।। रणी सोडिले अस्त्र नेटें विझाले । बहू राक्षसां थोर कल्पांत आले । त्वरें रावणी वायुअस्त्रास सोडी । असंभाव्य तो वात नेटें झडाडी ।। ३६ ।। कडाडीत पाडे असंभाव्य झाडें । बळे पाडिलों वाड झंबाड झाडें ।। फुटो लागली शैशंगे खडाडां । कडे चालिले पर्वतांचे भडाडा ।। ३७ ।। भ्रमों लागली खेचर प्रेत माली । गृहे गोपुरे एक वेळे उडाली ।। बहुसाल तो वात आवत जाला । तया देखतां मेघ नेटें उडाला ।। ३८॥ सुमित्रासुने देखिला चंड वारा । गिरीअस्त्र सोडूनि केला निवारा ।। असंभाव्य ती चालली शैलशंगे । बहू वात निर्यात केला प्रसंगे ।। ३९ ॥ , गिरी चालिले ते असंभाव्य कैसे । नभी धांवती मातले मेघ जैसे ।। महावीर तो वजअस्त्रासि सोडी । रणी रावणी शैल तात्काळ तोडी ।। ४० ।। रिपू राक्षसे शैल ते पिष्ट केले | बळें आपुल्या दिग्गजां आड नेले ।। पुढे जाहली ते बहू वज्जदाटी । तया देखता जाहला वीर जेठी ।। ४१ ।। पुढे वीर सौमित्र ब्रह्मास्त्र सोडी । तया पासुनि वन्हि नेटें भडाडी ।। गमे कोटी विद्युल्लता एक वेळा | महा लोळ कल्लोळ भासे भगोळा ।। ४२ ।। रणा मंडळी पावकें त्या अचाटें । जळो लागली सर्व ही वजथाटे ।। पुढे चालिल्या त्या असंभाव्य ज्वाळा । रणा मंडळी जाहली एक वेळा ।। ४३।। तया देखतां रावणी ते चि सोडी । रणामंडळी एकमेकांसि तोडी ।। रणामाजि तात्काळ सन्मख आले । महा ज्वाळ ते एक होऊनि k गेले ।। ४ ।। ७१. अबर=आकाश. ७२. हुडे-वरूज. ७३. तोय-पाणी. ७२. कल्पांत जलप्रलय हो- ण्याचा काळ. ७५. शैलशंगे डोंगरांची शिखरें. ७६. खेचरें आकाशात उडणारे पक्षी. 1. एक वळा-एक मेळा.j.जळों लागली=ळे जाळिली. ७७.आवर्त भोंवरा.k. 'एक होतां विजाले पा ०.