पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकोड. पुनः कोपला तो रिपू कोटिगूणे । शतांची शतें सोडिले बाण तेणे ।। नभामाजि ते बाण बाणी सणाणा । कितीएक स्फुल्लिंग भाली फणाणा ।। १७ ।। असंभाव्य ते जाहली बाणवृष्टी । जळो लागली पावके सर्व सृष्टी । अती चंड ते दंड अद्भूत कैसे । महाकाळ कल्पांतिचे मेघ जैसे ।। १८ ॥ कडाडां खडाडां गडाडां घडाडां। तडाडां थडाडां दडाडां धडाडां ।। बहूतां परीचे बह घोष झाले । ही चंद्रसूर्यादिकां कंप आले ।। १९॥ कितीयेक सिंधूदकें तप्त जाली । कितीएक सिंधूदके ती उडाली। असंभाव्य त्या दाटल्या बाणकोटी । बळे सोडिती पाडिती वीर जठी ॥ २० ॥ नभामानि कल्पांत ते बाणजाळीं । महायुद्ध तें होतसे अंतराळी ।। रिपू पेटले दोघ ही घोर मारा । भुमी वृष्टि गारा परी सर्व तारा ।। २१ ॥ वरी पाहतां बाणबाणी खणाणां । रिप येकमेकांसि तो भेदवेना ।। रथारूढ तो रावणी धांवताहे । पदी चालतां शेष *क्षा न साहे ॥ २२ ॥ पुढे चालिला वीर तो जांबुवंतू । शिळा घेतली धांवला काळकेतू ॥' बळे हाक देऊनियां चक्रचाली । उफाळे शिळा तो रथामाजि घाली ॥ २३ ॥ रथा मोडिले पाडिले भग्न केले । सुमित्रासुता रावणी साम्य जालें ।। सुगंधे विरे वैभवे लागवेगें । महा अश्व ते चूर्ण केले प्रसंगे ॥ २४ ॥ कपीनाथ बीभीषणे मारुतीने । विरा लागि सन्मानिले थोर माने ।। भले हो भले थोर आश्चर्य केलें । रिपच्या रथा विक्रम भंगवीले ॥ २५ ॥ नभी सर्व आनंदली देवसृष्टी । बहसाल संपादिली पुष्पवृष्टी ।। समस्तां मनी थोर आनंद जाला । रिसीं वानरी घोष अद्भत केला ॥ २६ ॥ म्हणे रावणी हा रिपू आवरेना । बहसाल सामर्थ्य याचे सरेना ॥ शरां मारितां सर्व तोडीत आहे । पुढें अग्निअस्त्रासि तो सोडिताहे ॥ २७ ॥ तये सोडितां अस्त्र तैसें निघाले । धडाडीत ते तेज पुंजाळ आलें । नभी धम्र दाटे असंभाव्य ज्वाळा । करूं पाहती भस्म नक्षत्रमाळा ।। २८ ।। असंभाव्य ते चालिली वहिवाडी । मही सर्व आकाश तेणे कडाडी ।। बह hवर्ण ज्वाला शिखा धांवताती । कडाडीत नेटे कपीमाजि येती ।। २९ ॥ कपी ऋक्ष तेणे भयातर जाले । कितीएक ते वीर पोटी गळाले ॥ बह सोडिला धीर नेत्यनाथे । म्हणे गा विरां सर्व गेलो अनर्थे ।। ३०॥ ६३. स्फुलिंग-ठिणग्या. ६५. पावक-विस्तव. ६६. यह-मंगळ, बुध, गुरु, शुक्र व शनि हे पंच तारा ग्रह.g. सिंधदकें ती उडाली ती श्वापदें हो जळाली. ६७. ऋक्ष= रीस, आस्वल. ६८. वन्हि-विस्तव. h. वर्णधुम्र. ६९. शिखाज्षाला. ... नैऋत्य- नाथ राक्षसस्वामी इंद्रजित.