पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड, म्हणे इंद्रजीतास नैऋत्यनाथ । बळें वीण तूं बोलशी व्यर्थ मातू ।। मजलागि तो काळ मारूं शकेना । वरू दीधला तोषला रामराणा ॥ ९९ ॥ बहू शीकवीले तुम्हां दुर्जनासी । परी नायका रे तुम्ही पापराशी ।। मज सांगतां होत अव्हेर केला । समस्तांसि येणे गुणे मृत्यु आला ॥ १० ॥ मला ताडिले वैभवाचेनि तोपें । बडालेत रे सर्व तेणे चि दोषे ।। समस्तांसि मारील हा रामराजा । समारंगणी मी च पाहीन वोजा ।। १०१ ॥ सभामंडपी फार त्यां गर्व केला । कळेना तुला मृत्यु संनीध आला ॥ तुला आजि मारील सौमित्र बाणीं । मुढा राक्षसा जाण हे सत्य वाणी ।। १०२।। बहुसाल धिःकार केला तयाते | प्रताप सिमा सांडिली इंद्रजीते ।। पदें ताडितां तो महा सर्प जैसा । रणी कोपला वीर राक्षेस तैसा ॥ १०३ ।। म्हणे रे उभा फीर, सन्मख राहे । समारंगणी bधीर संधान साहे ॥ बळे सोडिले बाण दारूण आले । सुमित्रासतें सर्व छेदून नेले ॥ १४ ॥ रणी घातला रावणानज पाठी । प्रतापें पुढे चालिला वीर नेठी ।। समारंगणी अंतकातुल्य भासे । महावीर तो देखतां जीव त्रासे ।। १०५ ॥ महा युद्ध होईल दोघांजणाशी । पढें सज्जनी चित्त द्यावें कथेसी । म्हणे दास ऊदास श्रोती न व्हावें । षी बोलिला ते चि हे सार ध्यावे ।। १०६ ।। प्रसंग सातवा. पणी शवणी वीर सन्मख जाले । बळाचे महाकाळ जैसे उदेले ।। करायास निर्वाण ते एकमेकां । विरश्रीबळे सोडिली सर्व शंका॥१॥ पढ़ें बोलिता जाहला इंद्रजीत । कृतांतापुढे निर्बळी मानवा तं ।। मरायासि कां व्यर्थ आलासि येथे । निमिष्यात मारीन रे बाणघातें ॥२॥ रणामाजि सन्मूख होतां बळेशी । समस्तां तुम्हां पाडिले नागपाशी ॥ पुन्हा मागुती सर्च ही बाणजाळी | निमालेत माझ्या करे युद्धकाळी ॥ ३ ॥ अरे काय झाली तुझी शक्ति तेथें । पुनः शीघ्र आलासि युद्धास येथे ।। तुवां आणिले काय सामर्थ्य जाया । बळे दावितां निर्बळे व्यर्थ बांयां ॥ ४ ॥ वृथा पुष्ट रे हा बहू रजिभ्राता । नृपें ताडिला रे सभेमाजि लाथा ।। a. फोर-धीर. b. धोर-घोर. ३९. अंतकातल्य-यमासारखा. १०. ऋषि वाल्मीकि ऋषि (आद्य कवि रामायणकर्ता).29. फणो शेषाचा अवतार लक्ष्मण.१२. रावणी- रावण पत्र इंद्रजित. १३. शंका-भीति. 22. कृतांत-यम. १५. निमिष-अत्यल्पकाळ. १६. बाणघात-बाणाचा तडाखा.?७. नागपाश- सापांची बंधनें.१८. राजमाता-रावणराजा- चा भाऊ विभीषण.