पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५०) श्रीसमदासकृत बळे कोपला काळ कृत्तांत जैसा । महावीर ऊठावला शीघ्र तैसा ।। कपी वीर दोघे त्वरेशी निघाले । बळे आपुल्या ते दळामाजि आले ।। ८३ ।। सुमित्रासुते वाहिला चंड मेढा | पुढे चालिला तो बळे वीर गाढा ।। कपी लोळ कल्लोळ कोटपानकोटी । दळेशी बळे चालिला वीर जेठी ।। ८४ ।। महावीर ते थोर राक्षस होते । कपीवीर ते धांवले शीघ तेथें ।। समारंगणी भार भारी मिळाले । कितीएक ते भीडतां भग्न जाले ।। ८५ ।। दळे लोटली राक्षसांची अचाटें | समारंगणी चालली दाट थाटे ।। बळे हाणिती शस्त्रघाते खणाणां । महीमंडळी घोष ऊठे दणाणा ।। ८६ ।। असंभाव्य राक्षेस मारीत आले । कपी वीर ते भंगले भग्न केले ।। तया देखतां मारुता कोप कैसा । बळें चालिला काळकृत्तांत जैसा ।। ८७ ।। गदा घेतली शीघ नैऋत्यनाथें । उडाला कपी ऋषभू व्योमपंथे । सुगंधू कपी लोटला वीर्यवंतू । बळें आगळा चालिला जांबुवंतू ।। ८८ ।। कपी काळ कल्पांतिचे मेघ जैसे । रणी लोटले गर्जती वीर तैसे ॥ बळे घालिती पालथे या भुगोळा । तिहीं मांडिला आट राक्षेस कूळा ।। ८९ ।। रणी हाणिती येकमेकां फडाडां । तुटो लागले पादपाणी तडाडां ।। नद्या लोटल्या शोणिताच्या भडाडां। समारंगणी घोष ऊठे धडाडां ।। ९० ।। रणी पाडिले दैत्य कोट्यानुकोटी । बहूती विरी दीवली त्यास पृष्टी ।। पुढे देखतां कोपला काळ जैसा । रणी लोटला रावणी वीर तैसा ।। ९१ ।। तया राक्षसे घोर संधान केले । कपीवाहिनीमाजि कल्पांत आले ॥ मयूरासि पिंजारिले पुच्छ जैसें । रणी पाडिले ते कपी वीर तैसे ।। ९२ ।। कपी मारुती सारिखे भग्न केले । कितीएक ते वीर धाके पळाले ।। पुढे पाहतां चीर सौमित्र कैसा | गजा देखतां ऊठला सिंह जैसा ।। ९३ ।। टणत्कारिले चाप काळााग्ने रोषे । थरारी धरा सप्त पाताळ घोषे ।। भुभी वर्षती मेघ ऊदंड गारा | चळो लागल्या त्या असंभाव्य तारा || ९४ ।। भिडाया रणी ऊठले वीर को । बळें सृष्टि जाळील नेणों प्रतापे । तंव शीव बीभीषणे वेग केला । गदा घेउनी वीर सन्मख जाला ।। १५ ।। सुमित्रासुवालागि सांडान मागें । पुढें धांवला वीर तो लागवेगे । रणी देखिला वीर बीभीषणू तो । तया बोलता जाहला रावणी तो ।। ९६ ।। म्हणे रे बहूतां दिसां देखिलासि । वृथा पुष्ट तूं राक्षसांमाजि होशी ।। नरे वानरें दास जालासि त्यांचा । मन भंगिला रे तुवां पूर्वजांचा ॥ ९५ ।। तुला ठाउका कोप माझा कृतांतू । मज इंद्रजीता पढें मश्यकू तूं ।। करूं पाहशी थोर सामर्थ्य येथें । समारंगणी धाडिता मत्यपंथे ।। ९८ ।।