पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड. धडाडां नद्या लोटल्या व्योमपंथें । भुमी तूटल्या घोर घाते विघातें ॥ ६८ ॥ महारण्य ते घोर नीकुंबळेचे । पुढे जावयालागि सामर्थ्य कैचे ।। समुद्रा तिरी दाटले वीस गांवें । पुढे जावया वाट नाही स्वभावे ।। ६९ ॥ भुमीपंथ नाही पुढे जावयातें । उडाले महावीर आकाशपंथे । समद्रासि सांडूनि वेगे निघाले । बळे शीघ्र नीकुंबळमाजि गेले ॥ ७० ।। पुढे काळविक्राळ ते वीर गाढे । बळे राक्षसी घातले सप्त वेढे ॥ तयांमध्यभागी विरें इंद्रजीतें । त्वरें आणली होमद्रव्ये बहूते ॥ ७१ ॥ घटी मद्यआज्यादि के मांस नेले । विरें राक्षसे शोणिते स्नान केलें ॥ पुढें श्वेदिकेमाजि हुताशैनू तो । महा वीर प्रेतासनी बैसला तो ।। ७२ ।। सहस्रक आहूतिचा नेम केला । म्हणे म्यां वधावे नरां वानरांला ।। शते भक्ति संख्या हुती लागवेगें । विरें घातल्या अग्निमूखी प्रसंगे ।। ७३ ।। रथ नीघतां हिंसती दिव्य घोडे । उदेले मखी आगळे घोष गाटे ।। तया धूर्त बीभीषणा श्रूत जाले । सुमित्रासुतालागि ते जाणवीले ।। ७४ ॥ म्हणे होम पूर्णाहुती लागि आला | प्रताप बळे पाहिजे यत्न केला ॥ म्हणे शेष गा धन्य बीभीषणा तूं | सवे धाडिले राघवे या चि हेतू ।। ७५ ॥ वधुं शीघ्र राक्षस हे बाणघाते । तंव वारिलें त्यासि नैऋत्यनाये ॥ म्हणे वो प्रभू झुंजतां पूरवेना । पुरा होम होतां रिपू आवरेना ।। ७६ ।। तंव बोलिला अक्ष तो जांबवंतू । म्हणे वीर हो आइका एक मातू ।। तुम्ही होम विध्वंसिने लागवेगें । रणामाजि मी पाडितों दैत्यदुर्गे ॥ ७७ ॥ मुखे बोलिला वीर मेरू बळाचा । सुमित्रासुतू गौरवी रम्य वाचा ॥ कपी ऋषभू आणि त्या वायुसूते । बळे घातली धांव आकाशपये ।। ७८ ॥ नभी मुख्य हे वीर दोघे उडाले । कपी रीस उदंड धांवनि गेले ॥ धबाबां शिळा टाकिती व्योमपंथें । बळें होम विध्वंसिला घोर घाते ॥ ७९ ॥ रथ मोडिला फोडिली सर्व पात्रे । बिरें मोडिले कुंड संकेतमात्रे ।। पढे वन्हि वीदारिला वेग केला । कितीएक राक्षेस तेथे निमाला ॥ ८ ॥ रिपू रावणी ध्यान भंगून पाहे । तंव भंगिला होम तो दीसताहे ।। खरे इंद्रजीतू नभी दाष्टि घाली । तंव ऋषभाने दिशाँ शीघ्र केली ॥ ८१ ॥ बळे होम विध्वंसिला मारुताने । देहे धर्म संपादिला ऋषभाने ।। पुढे पाहतां होम भंगून गेला । महा वीर राक्षेस युद्धा निघाला ॥ ८२ ॥ ३१. गांवें-योजनें. ३२. शोणित-रक्त. ३३. वेदिका होमकुंड. ३४. हताशन-विस्तव. ३५. कक्ष आस्वल. ३६. तेथे निमाला-भंगोनि गेला (पाठ). ३७. दिशा केली-विष्टा केली. ३८. देहधर्म संपादिला-विश केली.