पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४८) श्रीरामदासकृत जया देखतां काळ कांपे थरांरां । सवे दोधले राघवे पंचवीरां ।। हनूमंत बीभिषणू जांबुवंतू । सुगंधू कपी ऋषभू वीर्यवंतू ।। ५४ ।। महावीर ते पांच ही सिद्ध जाले । कपी रीस आणीक कीती निघाले ।। सुमित्रासुता लागि राजाधिराजे । मुखे बोलली शक्तिसामर्थ्यबीजे ॥ ५५ ॥ वरू दीधला स्वामिदेवाधिदेवें । म्हणे शत्रु जिंकोनियां शीत्र यावें ॥ करू मस्तकी ठेविला रामचंद्रे । नमस्कार तैसा चि केला केणींद्रे ।। ५६ ॥ समस्ती विरी ही नमस्कार केले । पुढें सव्य घालूनि तैसे निघाले । अतीआदरें स्कंधभागी विराने । सुमित्रासुता घेतले मारुतीने ।। ५७ ॥ निघाले महावीर ते लागवेगें । पिता हिंपुटी मारुती मागमागे ॥ पुढे चालतां पंय नीकुंबळेचा । विरां थोर आवेश काळासि कैचा ।। ५८ ॥ महा घोर तो लंधिला मार्ग तोही । पुढे पाहता पाहतां वाट नाहीं ।। तरूंची वने लागली ती वितंडें । प्रचंडे उदंडे बहू झाखडे ।। ५९ ॥ भुमी दाटले वृक्ष वृक्षा मिळाले । तया अंतरी वंश मिश्रीत झाले ॥ वरी पाहतां वाड आकाश पंथे । पुढे रीघ नाहीं तया वारियाते ॥ ६ ॥ समें वीषमे झाडखंडें अचाटें । मिळाली बळे वाजती कर्कराटे ॥ कडे तूटले थोर त्या पर्वताचे । झरे वाहती झाडखंडी विषाचे ।। ६१ ॥ तया अंतरी सिंह शार्दल कैसे । मदे मातले गर्जती काळ जैसे ।। गजांची बहू दाट थाट विशेषे । पळो लागती थोर किक्काट घोषे ॥ ६२ ॥ बहू संकटे धांवती रान म्हसे । रिसे कर्कशे देखता जीव त्रासे ।। बहू सांबरे चीतळे रानगाई । शुनी शूकरां मर्कटां मीति नाहीं ।। ६३ ।। बहू श्वापदें घोर नाना परीची । बहु गर्जताती बहुतां स्वरांची ।। भुते खेचरे शक्ति वेताळ पीसे । बह धांवती वन्हिचे ज्वाळ जैसे ॥ ६४ ॥ बहू व्याळ वेटाळले झाडखंडी । वने व्यापिली सर्व कळी उदंडों ।। बहुतां परीची बहू ती विखारे । विषे घोळती लीळ ती थोरथोरे ।। ६५॥ वहाती विषाचे महा वोघ तेथें । धधकारतां ज्वाळ आकाशपंथें ।। गिरीशी बळे आदळे तोयराशी । बहूसाल त्या तोडिलें पर्वताशी ।। ६६ ॥ गिरीशंग पाठार दारी कपाटें । शिळा शोखरें वक्ष पाषाण थाटें ॥ दरे दर्कुटे थोर भ्यासूरवाणे । बहूतां परींचे तरू ते पुराणे ॥ ६७ ॥ कडे कापले तोयनेटें भडाडी । गिरी कंदरी घोष तेणे धडाडी । २२. फणींद्र शेषाचा अवतार लक्ष्मण. २३. हिंपटी लानवदन. २१ झाडखड पक्षसमूह. २५. वंश-कळक, वेळ. २६. शार्दूल वाघ. २७. व्याक-साप. २८. लाळ- ती-खेळती (पाठ). २९. तोयराशी समुद्र. ३०. पुराणे-जुने,